बैरुत; वृत्तसंस्था : लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरुत शहराच्या दक्षिणेकडील बँकेवर इस्रायलने हवाई हल्ले केले. इस्रायलच्या लष्कराने रविवारची रात्र हिजबुल्लाशी संबंधित बँका नष्ट करण्यात घालवली.
अल-कर्द अल-हसन असोसिएशन संचलित बँकेकडून हिजबुल्लाच्या सदस्यांना विनाव्याज कर्जे दिली जात असत. संपूर्ण लेबनॉनमध्ये 31 शाखा आहेत. याच शाखांतून हिजबुल्लाच्या योद्ध्यांना वेतनही दिले जात असे. हिजबुल्लाची रसद तोडणे हा अर्थातच या हल्ल्यांमागील इस्रायलचा उद्देश होता.
हिजबुल्लाचा डेप्युटी सेक्रेटरी जनरल नईम कासिम हा या हल्ल्यांदरम्यान लेबनॉन सोडून इराणला पळून गेला आहे. हसन नसरल्लाप्रमाणेच नईमलाही इस्रायल ठार करेल म्हणून अब्बास यांनीच नईमला सोबत येण्यास उद्युक्त केले, असेही सांगितले जाते.
1983 : हिजबुल्ला संस्थापक सदस्य हज हसीन अल शामी यांनी या बँकेची स्थापना केली होती.
2016 : हिजबुल्लाला पैसा पुरवत असल्याने बँकेवर निर्बंध, याउपर दरवर्षी 42 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे सरासरी वाटप.