आंतरराष्ट्रीय

Israel Hamas War : ‘हमास’ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून शस्त्रपुरवठा

दिनेश चोरगे

तेल अविव; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचे वृत्त आहे. यामुळे इस्त्रायल आणि हमास अतिरेक्यांमधील युद्ध नव्या वळणार पोहोचण्याची शक्यता आहे.

पाकमधील दहशतवादी संघटना युक्रेनमध्ये काळ्या बाजारात शस्त्रांस्त्रांची विक्री करीत असून, युक्रेनमार्गे ही शस्त्रे हमासच्या दहशतवाद्यांना पुरविली जात असल्याचे उघड झाले आहे. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांना युक्रेनकडून हत्यारांचा पुरवठा केला जात असल्याचे याआधी उघड झाले आहे.

इराणकडूनही हमासला ड्रोन आणि रॉकेट लाँचर्स पुरवठा केला जात आहे. तालिबानी दहशतवाद्यांकडूनही हमासला अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्रे मिळत आहे. हमासला पाकमधील दहशतवाद्यांकडून होणार्‍या शस्त्रपुरवठ्यामुळे भारतालाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT