इस्रायलने लेबनॉनवरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत. (Image source- x)
आंतरराष्ट्रीय

'हिजबुल्ला'ची कोंडी! 'इस्रायल'च्या हल्ल्याने लेबनॉनचा सीरियाशी संपर्क तुटला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

इस्रायलने लेबनॉनवरील (Israel Hezbollah War) हवाई हल्ले तीव्र केले आहेत. यादरम्यान दक्षिणी बेरूत भागात मोठ्या प्रमाणात स्फोट झालेत. हिजबुल्लाचा बालेकिल्ला असलेल्या दहियेच्या उपनगराजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील भागात एक मोठा हल्ला झाला आहे. इस्रायलने बेरूतच्या दक्षिणी उपनगरात रात्रभर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. तसेच इस्रायलने लेबनॉनचा सीरियाशी जोडणारा एक मुख्य रस्ता हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केला आहे.

इस्रायलने सीरियासह लेबनॉनच्या मसना सीमा क्रॉसिंगजवळ शुक्रवारी सकाळी भीषण हवाई हल्ला (Israeli strikes on Lebanon) केला. यामुळे गेल्या काही काही दिवसांपासून इस्रायलच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी हजारो लोक वापर करत असलेला रस्ता उद्ध्वस्त झाला आहे, अशी माहिती लेबनॉनचे वाहतूक मंत्री अली हमीह यांनी रॉयटर्सशी बोलताना दिली.

हमीह पुढे म्हणाले की, इस्रायलने सीमा क्रॉसिंगजवळ लेबनॉनच्या हद्दीत हवाई हल्ला केला. यामुळे ४ मीटर (१२ फूट) रुंद खड्डा तयार झाला आहे.

Israel blocks Lebanon : हिजबुल्लाची कोंडी, लेबनॉनमधील रस्ता उद्ध्वस्त

तर इस्रायल संरक्षण दलाच्या (आयडीएफ) प्रवक्त्याने गुरुवारी, लेबनॉनमध्ये लष्करी उपकरणे वाहून नेण्यासाठी हिजबुल्लाने या क्रॉसिंगचा वापर केल्याचा आरोप केला होता. "इस्रायल संरक्षण दल शस्त्रांच्या तस्करीला परवानगी देणार नाही आणि तसे केल्यास कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. जशी या संपूर्ण युद्धात केली आहे," असे IDF चे प्रवक्ते अविचाय एड्राई यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे.

३ लाखांहून अधिक लोक लेबनॉनमधून सीरियात

लेबनॉन सरकारच्या आकडेवारीनुसार, ३ लाखांहून अधिक लोक, त्यापैकी बहुसंख्य सीरियन गेल्या १० दिवसांत इस्त्रायलच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लेबनॉनमधून सीरियात आले आहेत.

२४ तासांत ३७ ठार

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या जमिनीवरील आणि हवाई हल्ल्यांत ३७ लोक मारले गेले आहेत. गेल्या ऑक्टोबरपासून आतापर्यंत या हल्ल्यांत २ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT