पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलने बुधवारी गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात एका विदेशी नागरिकाचा मृत्यू झाला असून चार स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. सेंट्रल गाझा सिटीतील संयुक्त राष्टसंघाच्या कार्यालयाजवळ हा हल्ला करण्यात आला. पण हा दावा फेटाळून लावत उत्तर हमासमधील एका ठिकाणावर हल्ला केला असल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतान्याहू यांनी मंगळवारीच सुरु असलेल्या या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. तर युद्धबंदीची चर्चा या हल्ल्यांच्या दरम्यानच होऊ शकते असेही म्हटले आहे. आमचे लक्ष्य आमचे हमासच्या ताब्यातील बंधकांना सोडवणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी हमासवर दबाव आणण्याचे काम इस्त्रायल करत आहे.
नेत्यान्याहू यांनी पुढे म्हटले आहे की हमासच्या ताब्यातील बंधकांची सुटका ही आमची मुख्य अट आहे. तर ही फक्त सुरवात आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी झालेल्या हवाई हल्ल्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हमास - इस्त्रायल दरम्यान युद्धविराम होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.