बगदाद : इराकमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाईदरम्यान महिला खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून सुमारे ४९० कोटी रुपये रोख, २७ किलो सोने तसेच सोन्यापासून बनविलेली ब्रा आणि अंतर्वस्त्रे जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
इन्स्टाग्राम, एक्ससह विविध सोशल मीडिया खात्यांवर रोकड, सोन्याच्या लगड्या आणि कथित सोन्याच्या अंतर्वस्त्रांची छायाचित्रे शेअर करून हा दावा करण्यात आला. मात्र, या दाव्याला इराक सरकार किंवा तपास यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. इराकमध्ये सध्या भ्रष्टाचारविरोधी व्यापक मोहीम सुरू असून अनेक विद्यमान व माजी राजकारणी तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
विविध वृत्तांनुसार, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. मात्र, हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून ४९० कोटी रुपयांची रोकड, २७ किलो सोने किंवा सोन्याची ब्रा-अंतर्वस्त्रे जप्त झाल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेली सोन्याच्या अंतर्वस्त्रांची छायाचित्रेही याच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.