Iran US deal | ‘इराणी जनतेच्या हक्कांच्या रक्षणाशिवाय करार नाही’ : मोहम्मद बाघेर कालिबाफ 
आंतरराष्ट्रीय

Iran US deal | ‘इराणी जनतेच्या हक्कांच्या रक्षणाशिवाय करार नाही’ : मोहम्मद बाघेर कालिबाफ

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : इराणी जनतेच्या हक्कांची पूर्णपणे खात्री पटत नाही, तोपर्यंत आम्ही अमेरिकेसोबतच्या कोणत्याही कराराला मंजुरी देणार नाही, असा ठाम पवित्रा चर्चेतील इराणचे मुख्य मुत्सद्दी मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी रविवारी घेतला आहे. सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओ संदेशात त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली.

वाटाघाटींमध्ये इराण अत्यंत सावध पावले टाकत असल्याचे सांगत कालिबाफ म्हणाले, आमचा शत्रूच्या शब्दांवर किंवा त्यांच्या कोणत्याही आश्वासनांवर अजिबात विश्वास नाही. मध्य पूर्व युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू असतानाच इराणने आपल्या मागण्या पुन्हा लावून धरल्या आहेत. इराणच्या मते, त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध हटवणे आणि परदेशी बँकांमध्ये गोठवून ठेवलेली 12 अब्ज डॉलर्सची मालमत्ता परत मिळवणे हा इराणी जनतेचा मूलभूत हक्क आहे आणि कोणत्याही करारात याचा समावेश असणे अनिवार्य आहे. ट्रम्प यांनी अणू कार्यक्रम थांबवण्याबाबत केलेले दावे इराणच्या माध्यमांनी निराधारित म्हणून फेटाळून लावले आहेत. आधी गोठवलेली मालमत्ता मुक्त करा, मगच अणू कार्यक्रमावर चर्चा होईल, असे इराणचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT