आंतरराष्ट्रीय

Iran Warning : भारतासाठी धोक्याची घंटा: युद्धाची व्याप्ती हिंदी महासागरापर्यंत वाढवण्याचा इराणचा इशारा

सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर टांगती तलवार, अमेरिका-इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणची नवी खेळी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आता थेट भारताच्या सागरी सीमेपर्यंत म्हणजेच हिंदी महासागरापर्यंत विस्तारू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. ऊर्जापुरवठा आणि सागरी व्यापारासाठी या भागावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. अमेरिका किंवा इस्रायलने हल्ले वाढवले तर युद्धाची व्याप्ती वाढवली जाईल, असा थेट इशारा तेहरानकडून देण्यात आला आहे.

इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार याह्या रहीम सफावी यांनी गुरुवारी एका व्हिडीओ वक्तव्याद्वारे हा इशारा दिला आहे. पर्शियन गल्फ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून सुरू झालेला हा संघर्ष आता तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचला आहे.

जर युद्धाची तीव्रता वाढली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ही युद्धरेषा आणखी विस्तारू शकते आणि ती थेट हिंदी महासागरापर्यंत तसेच त्याच्या पुढेही जाऊ शकते, असे सफावी यांनी नमूद केले. त्यामुळे हा संघर्ष आता केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित न राहता भारताच्या सागरी परिक्षेत्राजवळ पोहोचण्याची चिन्हे आहेत.

सफावी यांच्या वक्तव्यात त्यांनी हिंदी महासागराचा उल्लेख केला असला, तरी इराण व्यापारी जहाजांना लक्ष्य करणार की लष्करी तळांना, याबाबत स्पष्टता दिलेली नाही. तरीही, आंतरराष्ट्रीय ऊर्जा मार्ग आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षिततेवर या इशाऱ्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT