ayatollah khomeini | donald trump Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US nuclear talks | अमेरिका-इराण युद्ध भडकणार? अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ल्याची इराणची धमकी...

Iran US nuclear talks | ट्रम्प म्हणतात- आण्विक कराराची काही गॅरंटी नाही!

Akshay Nirmale

Iran US nuclear talks nuclear deal Iran missile program US Iran conflict Donald Trump ayatollah khomeini

तेहरान/वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील आण्विक चर्चांमध्ये तणाव वाढत चालला आहे. इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेच्या क्षेत्रीय सैनिकी ठिकाणांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक करार शक्य होणार नसल्याबाबत आपली शंका व्यक्त केली आहे.

चर्चा अयशस्वी ठरल्यास सर्व अमेरिकी ठिकाणे..

इराणचे संरक्षणमंत्री अझीज नासिरझादेह यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले, “जर आण्विक कराराबाबतच्या चर्चांमध्ये यश मिळाले नाही आणि संघर्ष लादला गेला तर, आम्ही धाडसाने अमेरिकेच्या सर्व सैनिकी ठिकाणांवर हल्ला करू.” त्यांनी स्पष्ट केले की, मध्यपूर्वेतील अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांमधील सर्व ठिकाणे इराणाच्या निशाण्यावर आहेत.

आण्विक चर्चांचा सहावा टप्पा लवकरच

यूएस-इराण दरम्यान आण्विक चर्चांचा सहावा टप्पा पुढील आठवड्यात होणार असून, वॉशिंग्टनने याला गुरुवारी निश्चिती दिली आहे. तर, तेहरानने ओमानमध्ये रविवारी या वाटाघाटी होण्याची माहिती दिली आहे. इराण नवीन अमेरिकन प्रस्तावाचा विरोध करत आपल्या वेगळ्या अटींसह counter-proposal सादर करण्याच्या तयारीत आहे.

ट्रम्प म्हणतात, कराराची आशा कमीच...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला आधीपेक्षा खूप कमी आशा वाटत आहेत की इराण आण्विक कार्यक्रम थांबवेल. काहीतरी त्यांच्या बाजूने बदलले आहे. मी आता या कराराबाबत फारसा आश्वस्त नाही.”

जर त्यांनी नवीन आण्विक कराराला मान्यता दिली नाही तर इराणवर वारंवार सैनिकी कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. युद्ध न करता हा करार होणे अधिक चांगले आहे, पण मला वाटत नाही की ते करारासाठी तत्पर आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

इराणचे दावे आणि भूमिका

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर लिहिले आहे की, “आम्ही रविवारी पुन्हा चर्चेला बसत आहोत आणि इराणच्या शांततामय आण्विक कार्यक्रमासाठी करार शक्य आहे आणि तो लवकरच साधता येईल.”

इराण पुन्हा पुन्हा सांगत आहे की त्यांचा आण्विक कार्यक्रम केवळ नागरी वापरासाठी आहे. वीज निर्मिती, वैज्ञानिक संशोधन इत्यादींसाठी आहे. आण्विक शस्त्र तयार करण्याच्या योजना इराणने नाकारल्या आहेत.

इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हीच अडचण

इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम या करारातील अडथळ्यांपैकी एक आहे. नासिरझादेह यांनी सांगितले की, नुकत्याच त्यांनी दोन टन वजनाच्या युद्धवाहिनी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे आणि या क्षेपणास्त्रांच्या क्षमतांवर कोणतीही बंधने ते स्वीकारणार नाहीत.

फेब्रुवारीत इराणच्या सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनेई यांनी सैनिकी विकासावर भर दिला असून, क्षेपणास्त्रांच्या क्षमतांचा विस्तार करावा असे सांगितले होते.

2015 चा आण्विक करार आणि ट्रम्प यांचा निर्णय

2015 मध्ये अमेरिका आणि जागतिक शक्तींनी इराणशी आण्विक करार केला होता, ज्यात इराणने आण्विक कृतींवर बंधने स्वीकारली होती आणि बदल्यात आंतरराष्ट्रीय निर्बंधातून मुक्तता मिळाली होती. मात्र, ट्रम्प प्रशासनाने हा करार अत्यंत कमजोर असल्याचा आरोप करत 2018 मध्ये तो रद्द केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT