India Stand On Ayatollah Khamenei Killing: इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाईत इराणवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून. खामेनी यांच्या कुटुंबीयांचा देखील खात्मा झाला आहे.
या हत्येनंतर जगभरातील अनेक देशात आंदोलन होत असून भारतात देखील काश्मीर पासून लखनौपर्यंत विषेध व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी आक्रमक प्रदर्शने देखील झाली आहे. विरोधी पक्ष देखील नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांची निंदा करत आहेत. मात्र भारत सरकारनं मात्र खामेनी यांच्या मृत्यूची निंदा केलेली नाही. भारताने फक्त पश्चिम आशियात शांती आणि स्थीरता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे.
दरम्यन, आता सोनिया गांधी यांनी देखील सरकारच्या या भूमिकेवर टिका केली आहे. मात्र आयतुल्लाह खामेनी यांच्या हत्येवर भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत निंदा करणारे वक्तव्य आलेलं नाही. भारत सरकार एवढ्या मोठ्या घटनेनंतर गप्प बसण्यामागचं काय रहस्य आहे?
भारत आयतुल्ला खामेनी यांच्या हत्यानंतर गप्प बसण्यामागं एक नाही तर अनेक कूटनितीक कारणे आहेत. यामुळेच भारत अशा प्रकारची भूमिका घेत आहे.
इराण भारताचा ऐतिहासिक मित्र मानला जातो आणि अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणने भारताच्या भूमिकेचे स्वागत आणि समर्थन केलं आहे. मात्र असं असलं तरी इराण किंवा खामेनी भारतासोबत घनिष्ठ मैत्री निभवत होता असं नाही. अनेकवेळा इराणने घेतलेल्या भूमिकेमुळं त्यांच्या मैत्रीबाबत शंका निर्माण झाली होती.
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे सत्ताधाऱ्यांकडून अनेक महत्वाच्या प्रश्नावर सरकारची वकीली करत असतात. त्यांनी दोन दस्तऐवजांचा आधार घेत दावा केला की, १९६५ आणि १९७१ या दोन्ही युद्धात इराणने पाकिस्तानला भारताविरूद्ध लढण्यासाठी पैसे आणि शस्त्रे दिली होती. विमाने देखील दिली होती.
सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः आयतुल्लाह खामेनी यांनी भारतासोबतचं रेकॉर्ड पूर्णपणे चांगले आहे असं नाही. २०१७ ते २०२४ पर्यंत जवळपास ४ वेळा त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये इस्लामचे नाव घेऊन दखल देण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये त्यांनी काश्मिरी मुस्लीमांशी संवाद साधताना पाकिस्तानी बोली भाषेचा वापर केला होता.
२०१९ मध्ये भारत सरकारनं काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. त्यावेळी देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. इराणच्या संसदेनं देखील सीएएविरूद्ध मत व्यक्त केलं होतं. २०२० मध्ये दिल्ली दंगलीत देखील खामेनी यांनी ट्विट करून अतिरेकी हिंदूंकडून मुस्लीमांचा नरसंहार अशा भाषेचा प्रयोग केला होता. त्यांनी २०२४ मध्ये भारताची तुलना ही गाझा आणि म्यानमारशी करण्याचे धाडक केले होते.
भारताने खामेनी यांच्या मृत्यूवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर सर्व जी ७ देशांनी देखील खामेनी यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. अर्जेंटिना, युक्रेन, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन युनियन यांनी या मुद्द्यावर खुलेपणाने अमेरिका आणि इस्त्रायलची बाजू घेतली आहे.
याचबरोबर साऊदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इथं इराण आपल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे. विशेष म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) मधील १० पेक्षा कमी सदस्य देशांनी खामेनी यांच्या हत्येची निंदा केली असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
खामेनी यांच्या हत्येची उघड उघड निंदा करणाऱ्या देशांमध्ये रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराक, तुर्की, पाकिस्तान आणि मलेशिया या देशांचा समावेश आहे. जपान आणि जर्मनी या देशांनी भारतासारखीच भूमिका घेतली आहे.
भारताप्रमाणे अनेक देशांनी देखील देशहीताला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळं भारताची ही प्रतिक्रिया कॅलक्युलेटेड आहे. याद्वारे इराणच्या हल्ल्यांनी बेजार झालेल्या आखातातील सहयोगी देशांसोबतच्या संबंधांना प्राथमिकता देण्यात आली आहे.