Iran US Isreal War Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला शांततेसाठी इराणसोबत वाटाघाटी सुरू आहेत असं सांगतात आणि दुसऱ्या बाजूला इराणवर अमेरिकेने केलेल्या बंकर बस्टर बॉम्ब वर्षावाचा व्हिडिओ शेअर करत आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत बी २ बंकर बस्टर बॉम्बचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत इराणची इस्फाहनमधून आगीच्या ज्वाला गगनाला भिडताना दिसत आहेत.
तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर शांततेसाठीची डील झाली नाही तर इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. यानंतर ट्रम्प यांनी आज आपल्या ट्रूथ प्लॅटफॉर्मवर कॅप्शन न टाकता एक व्हिडिओ शेअर केला. यात इस्फाहनमध्ये रात्री अनेक मोठे स्फोट आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत. या शहरात २० लाखापेक्षा जास्त लोकं राहतात. तिथंच बादर लष्करी एअरबेस देखील आहे.
दुसरीकडं इराणने देखील इस्त्रायलच्या वर्मी घाव घातल्याचं दिसून येत आहे. इस्त्रायलसाठीची अत्यंत पवित्र शहर असलेल्या जेरूसलेममध्ये जवळपास १० स्फोट ऐकू आले आहेत. इस्त्रायलने ते इराणच्या मिसाईलला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे सांगितलं. यावरून अमेरिका इराण युद्ध हे चिघळत आहे असं दिसत आहे. त्यातच जेरुसलेममध्ये जवळपास १० स्फोट ऐकू आल्याचे वृत्त AFP ने दिले आहे. दरम्यान, इस्त्रायली लष्कराने सांगितलं की जेरूसलेममध्ये त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम ही इराणच्या मिसाईल्सला प्रत्युत्तर देत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्शिनविना शेअर केलेल्या व्हिजिओबद्दल बोलायचं झालं तर द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने इस्फाहनवर तब्बल २००० पाऊंड बंकर बस्टर बॉम्ब टाकले आहेत. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पेनिट्रेटर देखील वापरल्याचे वृत्त आहे.
इस्फाहन हे शहर इराणच्या न्युक्लिअर प्रोग्रामसाठी लागणाऱ्या समृद्ध युरेनियमचं घर मानलं जात आहे. गेल्या वर्षी अमेरिकेनं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये देखील याच शहराला टार्गेट करण्यात आलं होतं. या ऑपरेशनला मीडनाईट हॅमर असं सांगितलं. हा हल्ला इराणची न्युक्लिअर फॅसिलिटी नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता.
B2 बॉम्बर हे GBU-57 बंकर बस्टर वाहून नेण्याची क्षमता असलेलं अत्याधुनिक बॉम्बर विमान आहे. हा बंकर बस्टर बॉम्ब हा जमिनीखाली खोलवर असलेल्या बंकरमध्ये घुसून स्फोट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या बॉम्बचे निर्मिती ही जमिनीखालील न्युक्लिअर फॅसिलीटी आणि कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आली आहे.
B2 बॉम्बर हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. या विमानाचे डिझाईन असं केलं आहे के ते रडावर दिसत नाही. त्यामुळं ते उच्च दर्जाच्या हवाई सुरक्षेला देखील सहज चकवा देऊ शकते. याची निर्मिती अंडरग्राऊंड्स टार्गेट हीट करण्यासाठी करण्यात आली आहे. हे GBU-57 बॉम्ब वाहून नेणारे एकमेव विमान आहे.