Israel-Iran War | थेट युद्धभूमीवरून कोठे काय घडले; 29 वा दिवस File Photo
आंतरराष्ट्रीय

Israel-Iran War | थेट युद्धभूमीवरून कोठे काय घडले; 29 वा दिवस

सौदी हवाई तळावरील इराणी हल्ल्यांत 25 वर अमेरिकी सैनिक जखमी

पुढारी वृत्तसेवा

दुबई (एपी) : गेल्या आठवड्यात सौदी हवाई तळावर झालेल्या इराणी हल्ल्यांमध्ये दोन डझनांहून अधिक अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी दिलेेल्या माहितीनुसार, इराणने शुक्रवारी सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 29 ड्रोन डागले, ज्यात किमान 15 सैनिक जखमी झाले, त्यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत. अमेरिकी अधिकार्‍यांनी सुरुवातीला सांगितले की, किमान 10 अमेरिकी सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.

इराणने यूएईवर डागली 20 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, 37 ड्रोनचाही वापर

तेहरान ः इराणने संयुक्त अरब अमिराती (यूएई)वर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, किमान 20 इराणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि 37 ड्रोनने संयुक्त अरब अमिरातीवर डागण्यात आली. तथापि, ही सर्व क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

अमेरिका प्रस्तावाचा इराणकडून विचार

तेहरान : इराण अमेरिकेच्या 15-कलमी प्रस्तावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. मात्र एका अधिकार्‍याने तो एकतर्फी आणि अन्यायकारक असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. सूत्रांच्या वृत्तांनुसार, या प्रस्तावातील मागण्यांमध्ये इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्याचा मुद्दा आहे. इराणच्या क्षेपणास्त्र विकासावर अंकुश ठेवणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण सोपवण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.

अमेरिका-इराक समन्वय वाढणार

बगदाद : इराण आणि त्यांच्या समर्थक सशस्त्र गटांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी अमेरिका आणि इराक समन्वय वाढवतील, असे अमेरिकेने म्हटले आहे. बगदादमधील अमेरिकी दूतावासाने सांगितले की, दोन्ही बाजूंनी सुरक्षा सहकार्य अधिक द़ृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, हल्ले रोखण्यासाठी इराकी भूभागाचा वापर केला जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इराकी आणि अमेरिकी पक्षांनी सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

थायलंडच्या जहाजांना परवानगी

बँकॉक : थायलंडने इराणसोबत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून थाई तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याबाबत एक करार केला आहे. थाई तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत एक करार झाला आहे, असे थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT