Iran drone attack Israel | इस्रायली हवाई तळावर इराणचा ड्रोन हल्ला File Photo
आंतरराष्ट्रीय

Iran drone attack Israel | इस्रायली हवाई तळावर इराणचा ड्रोन हल्ला

जेरुसलेममध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याचे सायरन

पुढारी वृत्तसेवा

तेहरान/जेरुसलेम; वृत्तसंस्था : इराणच्या लष्कराने इस्रायली हवाई तळ आणि देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा शिन बेटच्या मुख्यालयावर ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्ध गेले 13 दिवस सुरू आहे.

इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने लष्कराच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सैन्याने झिऑनवादी राजवटीचे पालमाचिम आणि ओव्दा हे हवाई तळ, तसेच शिन बेटच्या मुख्यालयावर ड्रोन हल्ले केले आहेत. या दाव्यावर इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, इराणकडून डागलेली आणखी काही क्षेपणास्त्रे ओळखल्याचे इस्रायलने म्हटले आहे. गुरुवारी जेरुसलेममध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याचे धोक्याचे सायरन वाजले आणि इस्रायली सैन्याने ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले.

इराण आणि हिजबुल्लाने रात्रीच्या सुमारास केलेल्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल अवीवसह लेबनॉनच्या सीमावर्ती भागात राहणार्‍या इस्रायली नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थानांकडे धाव घ्यावी लागली. या हल्ल्यांमुळे संपूर्ण इस्रायलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केल्याचे जाहीर केले आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत इस्रायलमध्ये किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2,000 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इस्रायली अधिकार्‍यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT