कतारच्या सर्वांत मोठ्या गॅस प्रकल्पावर इराणचा हल्ला 
आंतरराष्ट्रीय

US Israel Iran war: कतारच्या सर्वांत मोठ्या गॅस प्रकल्पावर इराणचा हल्ला

उत्पादन थांबवले; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ

पुढारी वृत्तसेवा

दोहा : कतारच्या सर्वात मोठ्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) प्रकल्प असलेल्या रास लाफानवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू बाजारपेठेतील खळबळ वाढली आहे. जगातील सर्वांत मोठ्या असलेल्या कतारच्या या प्रकल्पावरील हल्ल्याचा थेट परिणाम म्हणून या ठिकाणचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.

इराणने संयुक्त अरब अमिरात, कुवेत आणि सौदी अरेबियावरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. या देशातील अमेरिकेची वित्तीय आणि लष्करी केंद्रे लक्ष्य करण्यात येत आहे. कतार, संयुक्त अरब अमिरात, कुवेत आणि सौदी अरेबियाने नवीन स्फोट आणि ड्रोन हल्ले रोखल्याचे वृत्त दिले आहे.अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यासोबत कतारची गणना जगातील प्रमुख उत्पादकांमध्ये होते. इराणचा येथील हा पहिलाच हल्ला नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, इराणने कतारच्या वायू क्षेत्रांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यामुळे जगातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू निर्यातदार कंपनी कतार एनर्जीला उत्पादन थांबवण्यास भाग पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू साठ्याचा भाग असलेल्या इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत.

मध्य पूर्वेतील युद्धाला कारणीभूत ठरलेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेल्या कारवाईचा सर्वाधिक फटका आखाती प्रदेशाला बसला आहे. इराणने अमेरिकेच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याबरोबरच ऊर्जा प्रकल्पांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील हायड्रोकार्बन समृद्ध राजेशाहींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हल्ले रोखल्याचे दावे

दरम्यान, कुवेत नॅशनल गार्डने सांगितले की, त्यांनी पहाटे एक मानवरहित विमान पाडले. कुवैती सैन्याने शत्रूचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखत असल्याचे सांगितल्यानंतर काही तासांनी हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात (युएई), सौदी अरेबिया आणि बहरीन यांनीही गेल्या काही तासांत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखल्याचे वृत्त दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT