लहरी ट्रम्प Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये शॉटगन घेऊन घुसणारा तरुण कारवाईत ठार

एफबीआय, सिक्रेट सर्व्हिस, शेरिफ कार्यालयाचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : फ्लोरिडामधील पाम बीच येथील अध्यक्षीय सुरक्षा असलेल्या ‘मारा-ए-लागो’ रिसॉर्टमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका विशीतील गोर्‍या तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्य त्यावेळी वॉशिंग्टनमध्ये होते आणि घटनेच्या वेळी रिसॉर्टवर कोणतीही संरक्षित व्यक्ती उपस्थित नव्हती, अशी माहिती युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिसने दिली.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रात्री सुमारे 1.30 वाजता रिसॉर्टच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ दिसला. त्याच्या हातात शॉटगनसारखे दिसणारे शस्त्र आणि इंधनाचा डबा असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी पाहिले. त्यानंतर तो रिसॉर्टच्या संरक्षित सुरक्षा परिघात आत शिरला. पाम बीच काऊंटीचे शेरिफ रिक ब्रॅडशॉ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळी पोहोचलेल्या डेप्युटी आणि फेडरल एजंटांनी संशयिताला शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले.

त्याने इंधनाचा डबा खाली ठेवला. मात्र त्यानंतर त्याने शॉटगन फायरिंगच्या स्थितीत उचलली. त्याक्षणी संभाव्य धोका निष्प्रभ करण्यासाठी एजंटांनी गोळीबार केला, असे शेरिफ ब्रॅडशॉ यांनी स्पष्ट केले. गोळीबारात संशयित जागीच ठार झाला. त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सिक्रेट सर्व्हिसचे विशेष एजंट राफेल बारोस यांनी सांगितले की, दोन फेडरल एजंट थेट या कारवाईत सहभागी होते. प्राथमिक माहितीनुसार संशयिताकडे पेट्रोलचा कॅनही होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT