Indigo Airlines:  file photo
आंतरराष्ट्रीय

इंडिगो एअरलाईन्स बनणार जगात नंबर 1; अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्सला मागे टाकण्यास सज्ज

Indigo Airlines: जगातील टॉप 10 एअरलाईन्समध्ये एकमेव भारतीय कंपनी; इंडिगोची मार्केट कॅप 23.24 बिलियन डॉलरवर

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील सर्वात मोठी इंडिगो एअरलाईन्सने कंपनी बुधवारी (8 एप्रिल 2025) बाजार भांडवलाच्या बाबतीत अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सला मागे टाकून जगातील सर्वात मूल्यवान एअरलाइन बनली.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, इंडिगोच्या शेअरने (इंटरग्लोब एव्हिएशन) 5262.5 चा उच्चांक गाठला. त्यामुळे दुपारी अ़डीज वाजता कंपनीचे बाजार मूल्य 23.24 बिलिनय डॉलरवर पोहचले. ते अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्सचे बाजार मूल्य 23.18 बिलियन डॉलरहून अधिक झाले.

तथापि, इंडिगोचा हा आनंद जास्तकाळ टिकला नाही. कारण भारतीय शेअर बाजार बंद होईपर्यंत इंडिगो शेअरचा भाव 5194 वर घसरला. त्यामुळे इंडिगो कंपनीचे बाजारमुल्य 23.16 बिलियन डॉलरवर आले.

इंडिगोचे महत्त्व

इंडिगो ही एकमेव भारतीय एअरलाईन आहे जी जगातील टॉप 10 एअरलाईन्समध्ये स्थान मिळवते. इंडिगो दर आठवड्याला 15768 फ्लाइट्स चालवते. असा डेटा एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म सिरियमने दिला आहे. ज्यात 12.7 टक्के वाढ झाली आहे. जे गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत जास्त आहे.

भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रातील वाढ

भारतातील हवाई प्रवासाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी भारतीय एअरलाईन्स कंपन्यांनी 2023 पासून अनेक मोठ्या विमान ऑर्डर दिल्या आहेत. एअर इंडिया समूहाने फेब्रुवारी 2023 मध्ये 470 विमाने ऑर्डर केली, त्यामध्ये 250 एअरबस आणि 220 बोईंग विमाने आहेत.

इंडिगो ने जून 2023 मध्ये एअरबससोबत 500 A320neo विमाने खरेदी करण्याचा करार केला. ही जगातील सर्वात मोठी विमान ऑर्डर मानली जाते.

2024 मध्ये अकासा एअरने बोईंगकडून 150 B737 Max विमाने ऑर्डर केली, तर इंडिगोने 30 A350 विमाने खरेदी केली. जी तिच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

भारतीय नागडी उड्डाण क्षेत्राचे भविष्य

भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रातील वाढत्या क्षमतेमुळे आणि व्यावसायिकपणे चालवलेल्या एअरलाइन्समुळे भारत पुढील 15 वर्षांत जगातील विमानन केंद्र बनेल, असे एअरबसच्या ग्राहक खात्याचे प्रमुख एडवर्ड डेल्हाए यांनी 2024 मध्ये सांगितले होते.

भारताकडे सध्या सुमारे 800 वाणिज्यिक विमाने आहेत आणि त्यामधून बहुतेक विमाने एअरबसची आहेत. इंडिगोच्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमानन क्षेत्राचा वाढता प्रभाव आणि विकास यामुळे भारत पुढील काळात जगातील विमानन क्षेत्रात प्रमुख स्थान मिळवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT