पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शिकागो शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये घडला. साई तेजा नुकारापू (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील आहे.
बीआरएसचे आमदार मधुसुदन थाथा यांनी अमेरिकेतून मिळालेल्या प्राथमिक माहितीचा हवाल देत सांगितले की, साई तेजा नुकारापू याने बीबीए पदवी घेतली आहे. तो अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेत होता. तसेच तो अर्धवेळ नोकरी करत होता. शनिवारी पहाटे तेजा एका शॉपिंग मॉलमधील कॅश काउंटरवर काम करत असताना सशस्त्र दरोडेखोर मॉलमध्ये आले. त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. रोकड घेवून पलायन केले. तेजा याचा जागीच मृत्यू झाला.
२००९ नंतर अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भारतील विद्यार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांनी वाढ होऊन भारताने चीनला मागे टाकले आहे. यातील ५६ टक्के विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे आहेत आहे. यामध्ये तेलंगणाचे ३४ तर आंध्र प्रदेशचे २२ टक्के विद्यार्थी आहेत. भारतामधून गेल्या वर्षी 3.3 लाख विद्यार्थी अमेरिकेला गेले आहेत.