हमासशी संबंध असल्‍याच्‍या संशयातून अमेरिकेत ताब्‍यात घेण्‍यात आलेला विद्यार्थी बदर खान सुरी. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

हमासशी 'कनेक्‍शन'चा संशय, अमेरिकेत भारतीय विद्यार्थी ताब्यात

ज्‍युविरोधी भावना भडकविल्‍याचा आरोप, हद्दपारीची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेला भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासशी संबंध असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्‍यात आले आहे, असे वृत्त 'फॉक्‍स न्‍यूज'ने अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभाग (डीएचएस)च्‍या हवाल्‍याने दिले आहे. (Indian student detained in US)

अमेरिकन नागरिक असणार्‍या पत्‍नीचा गाझाशी संबंध

बदर खान सुरी याने भारतातील एका विद्यापीठातून शांतता आणि संघर्ष या विषयात पीएचडी केली आहे. सध्‍या तो अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठात इराक आणि अफगाणिस्तानातील शांतता निर्माण या विषयावर संशोधन करत होता. विद्यार्थी व्हिसावर त्‍यो अमेरिकेत वास्‍तव्‍य आहे. त्‍याने अमेरिकन महिला माफीज सालेह हिच्‍याशी विवाह केला आहे. ती सालेह गाझा येथील असून, तिने अल जझीरा आणि पॅलेस्टिनी माध्यमांसाठी लेखन केले आहे. तसेच तिने गाझामधील परराष्ट्र मंत्रालयातही काम केले आहे. सोमवारी रात्री व्‍हर्जिनियातील त्‍याच्‍या घराबाहेर त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले. त्‍याच्‍यावर सोशल मीडियावर अमेरिकेत ज्‍युविरोधी भावना पसरवण्याचा आणि हमासशी संबंध असल्याचा आरोप आहे.

अमेरिकेतून हद्दपार हाेण्‍याची शक्‍यता

१८ मार्च रोजी सुरी याने अटकेला आव्हान देणारी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. सुरी याला लुईझियानामधील अलेक्झांड्रिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आयसीई डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्यांतर्गत त्‍याला अमेरिकेतून हद्दपार करण्‍यात येणार असल्‍याचा निर्णय परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी १५ मार्च रोजी जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT