प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz ship accident| होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 'मालाऊ नौके'ला भीषण आग; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, ४ जखमी

जखमींवर दुबईत उपचार सुरू, १३ जहाजे अजूनही पर्शियन आखातात

पुढारी वृत्तसेवा

Strait of Hormuz ship accident

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) १८ भारतीय खलाशी असलेल्या एका लाकडी मालाऊ नौकेला (पारंपारिक लाकडी नौका) भीषण आग लागून ती उलटली. या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू

एएनआय दिलेल्‍या वृत्तानुसार, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. नौकेला आग लागून ती उलटल्यानंतर जवळून जाणाऱ्या एका जहाजाने खलाशांची सुटका केली. "या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या दुबईत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.

दूतावासाकडून मदत कार्य सुरू

घटनेनंतर लगेचच भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी वाचवलेल्या नागरिकांची भेट घेतली. आमच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी काल रात्रीच वाचवलेल्या भारतीयांची भेट घेतली आहे. दूतावास नौकेच्या मालकाशी देखील संपर्कात असून सर्व शक्य ती मदत पुरवली जात असल्‍याचे दुतावासाने स्‍पष्‍ट केले.

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

यापूर्वी गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली होती की, ११ भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली असून १३ जहाजे अजूनही पर्शियन आखातात आहेत. इतर देशांची जहाजे आंतरराष्ट्रीय जलमार्गातून प्रवास करू इच्छित असतील, तर कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते. मात्र, भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्याबाबतचा तांत्रिक प्रश्न नौवहन मंत्रालय किंवा संबंधित तांत्रिक अधिकारीच देऊ शकतील. आमच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे आणि इराणसोबतच्या चर्चेमुळे सकारात्मक प्रगती झाली आहे. आतापर्यंत ११ भारतीय जहाजे बाहेर पडली आहेत. उर्वरित १३ जहाजे देखील लवकरात लवकर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारतात पोहोचावीत यासाठी आम्ही इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT