Indian Engineer Dies In Dubai : दुबईतील जुमेराह समुद्र किनारी स्कूबा डायव्हिंग दरम्यान भारतीय इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. इसाक पॉल ओलाक्केनगिल (वय २९) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा केरळ येथील आहे.
'खलीज टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ओलाक्केनगिल हे त्यांच्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केरळला गेले होते. त्यांची पत्नी रेशम आणि धाकटा भाऊ इविन यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जुमेराह समुद्र किनारी गेले होते. यावेळी त्यांनी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला. पाण्याखाली श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ओलाक्केनगिल यांना त्यांना पाण्याखाली हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ समुद्र किनार्यावर आणण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यता आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती ओलाक्केनगिल यांचे काका डेव्हिड प्यारीलोस यांनी दिली.
या घटनेचा मोठा मानसिक धक्का ओलाक्केनगिल याचा भाऊ इव्हिन याला बसला आहे. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुबईच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी स्कूबा डायव्हिंग सत्रादरम्यान वापरलेली उपकरणे त्याचे विश्लेषण करण्यासाठी जप्त केली आहेत. आवश्यक कायदेशीर कागदपत्रे मिळाल्यानंतर श्री ओलाकेंगिल यांचे मृतदेह भारतात परत पाठवले जाईल, असे दुबईतील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.