लंडण : पुढारी ऑनलाईन
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसे शांत आणि संयमीपणासाठी प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानकडून मुंबईवर २६/११ सारखा क्रुर हल्ला घडवण्यात आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा दृढनिश्चय केला होता. याबाबत ते माझ्याशी बोलले होते, जर पुन्हा मुंबई सारखा दहशतवादी हल्ला झाला, तर पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता, असे ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांच्या 'फॉर दी रेकॉर्ड' पुस्तकात नमूद केले आहे.
कॅमेरॉन यांनी पुस्तकावरून अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी 'भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंधावरून अनेक बाबींवर प्रकाशोत टाकला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना माजी पंतप्रधान यांना शांत आणि संत माणुस म्हणून संबोधले आहे. ते आपल्या आठवणीत सांगतात, पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला असता, तर पंतप्रधान मनमोहन सिंग हे लष्कराच्या मदतीने पकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
कॅमेरॉन पंतप्रधान असताना द्विपक्षीय भेटीसाठी २०१० ते २०१६ या कालावधीत भारतात तीन वेळा आले होते. त्यांनी २०१६ साली ब्रेक्झिटवरून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.'
ते लिहितात, माझे आणि मनमोहन सिंग यांचे चांगले संबंध आहेत. ते एक संत व्यक्ती आहेत. पण ज्यावेळी धोका निर्माण व्हायचा ते कणखर व्हायचे. मी, जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा मी भारतात भेट दिली होती. त्यावेळी सिंग मला म्हणाले, "भारतात २६/११ सारखा हल्ला पुन्हा झाला तर भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करेल," असे कॅमेरॉन यांनी पुस्तकात म्हटले आहे.
त्यांनी पीएम मोदी यांना व्हिसा देण्यापासून त्यांच्या ब्रिटनमध्ये झालेल्या जंगी सभेचाही आढावा घेतला आहे. पीएम मोदींना गुजरात दंगलीनंतर अमेरिका तसेच ब्रिटनकडून व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यांनी २०१४ मध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर त्यांना अमेरिका आणि ब्रिटनकडून व्हिसा मंजूर करण्यात आला होता. गुजरात दंगलीवेळी मोदी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.