UN General Assembly 2025 file photo
आंतरराष्ट्रीय

UN General Assembly 2025: ओसामा बिन लादेन ते पहलगाम हल्ला; संयुक्त राष्ट्रांत भारतानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फटकारलं

India Pakistan UNGA 2025 : संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केलेल्या भाषणाला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

मोहन कारंडे

UN General Assembly 2025

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाला भारताने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने त्यांच्या वक्तव्यांना "हास्यास्पद नाट्य" म्हणत फटकारले आणि "कोणत्याही नाटकामुळे सत्य लपवता येणार नाही," असे ठामपणे सांगितले.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमधील प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी 'राइट ऑफ रिप्लाय' चा वापर करत पाकिस्तानवर तीव्र टीका केली. गहलोत म्हणाल्या, "या सभेने सकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून हास्यास्पद नाट्य पाहिले, ज्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचे उदात्तीकरण केले आहे, जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे."

पाकिस्तानच्या दहशतवादाच्या रेकॉर्डकडे लक्ष वेधून गहलोत यांनी पहलगाम हल्ल्यात इस्लामाबादच्या भूमिकेवर जोर दिला. त्या म्हणाल्या, "कोणत्याही नाटकामुळे आणि खोटेपणामुळे सत्य लपवता येणार नाही. हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रेझिस्टन्स फ्रंट जी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे तिला भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या अमानुष हत्याकांडाच्या जबाबदारीपासून वाचवले."

पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इतिहास आठवण करून देताना गहलोत म्हणाल्या, "दहशतवाद पसरवण्याच्या आणि निर्यात करण्याच्या परंपरेत खोलवर रुजलेल्या देशाला या उद्देशाने अत्यंत हास्यास्पद कथा पुढे आणण्याची लाज वाटत नाही. लक्षात घ्या, त्यांनी ओसामा बिन लादेनला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भागीदार असल्याचा आव आणत असतानाही दहा वर्षे आश्रय दिला. त्यांच्या मंत्र्यांनी नुकतेच कबूल केले आहे की ते अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवत आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT