वॉशिंग्टन; पीटीआय : भारताविरोधातील संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचे थोतांड सांगणार्या पाकिस्तानचा भारताने शनिवारी संयुक्त राष्ट्रातील महासभेत बुरखा फाडला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात झालेल्या संघर्षात विजयाचा दावा केला. त्यावर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानची पोलखोल केली.
पेटल म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी अड्डे आणि पाकिस्तानी हवाई तळ नेस्तनाबूत झाल्याचे जगाने पाहिले. युद्धविरामासाठी पाकिस्ताननेच प्रथम भारताकडे दयेची याचना केली. उद्ध्वस्त धावपट्ट्या आणि जळालेले हँगर्स हा विजय असेल, तर पाकिस्तानला त्याचा आनंद घेण्यास हरकत नाही, असे म्हणत गेहलोत यांनी शरीफ यांच्या दाव्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
शाहबाज शरीफ यांनी कडव्या हिंदुत्वाचा जगाला धोका असल्याचा कांगावा केला. यावरही पेटल यांनी शरीफ यांची चांगलीच कानउघाडणी केली. पेटल म्हणाल्या की, पाकिस्ताकडून दहशतवाद्यांचे उदात्तीकरण सुरू आहे. अमेरिकन कारवाईत मारला गेलेला अल कायदाचा म्होरक्या अनेक वर्षे पाकमध्येच ठिय्या मारून होता. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असल्याचे पेटल यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये निदशर्र्नास आणून दिले.