डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला एस जयशंकर उपस्थित राहणार  file photo
आंतरराष्ट्रीय

Trump swearing In Ceremony | डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला एस जयशंकर उपस्थित राहणार

२० जानेवारी रोजी शपथविधी सोहळा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री (EAM) डॉ. एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ २० जानेवारी रोजी होणार आहे. ट्रम्प-व्हान्स उद्घाटन समितीने जयशंकर यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्री जयशंकर नवीन अमेरिकन प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. या प्रसंगी वॉशिंग्टन डीसीमध्ये उपस्थित असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय मान्यवरांशी देखील ते संवाद साधतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT