Modi Trump Meeting | ट्रम्‍प यांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ हेच कारण... 
आंतरराष्ट्रीय

Modi Trump Meeting | ट्रम्‍प यांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ हेच कारण...

जी-७ मध्ये मोदी-ट्रम्‍प भेटीपूर्वी ‘नो प्रेस’बाबत भारताची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : जून महिन्यात फ्रान्समध्‍ये आयोजित जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या भेटीपूर्वी पत्रकारांशी होणाऱ्या संवादाबाबत झालेल्या चर्चेवर सूत्रांनी भारताची बाजू मांडली आहे. व्‍हीव्‍हीआयपी दौऱ्यापूर्वी कार्यक्रमांचे स्वरूप, वेळापत्रक व सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यपद्धतीबाबत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होणे ही सामान्य राजनैतिक प्रक्रिया आहे, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या विधानानंतर ही बाब समोर आली आहे. फ्रान्समधील जी-७ परिषदेत मोदी व ट्रम्‍प भेटीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधायचा नाही, अशी विनंती भारताने केली होती, असे गोर यांनी म्हटले होते.

ट्रम्‍प यांच्या ‘अकल्पित’ वर्तनाबाबत खबरदारी

परदेशी शिष्टमंडळ बहुतांश वेळा ट्रम्‍प यांच्या भेटीआधी विशेष खबरदारी घेतात. सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांचे अकल्पित वर्तन हे यामागील मुख्य कारण मानले जाते. दक्षिण आफ्रिका, युक्रेन व इतर देशांच्या नेत्यांसोबतच्‍या चर्चेदरम्यान ट्रम्‍प यांनी अकल्पित प्रश्न विचारताना टिप्पण्या केल्‍या होत्‍या.

सर्जिओ गोर यांनी काय म्हटले होते?

गोर यांनी सांगितले की, या भेटीपूर्वी ट्रम्‍प यांनी भारतीय बाजू कोणते मुद्दे उपस्थित करणार अशी विचारणा माझ्‍याकडे केली होती. त्‍यावर मी त्यांना मोदी यांच्या बैठकीपूर्वी भारताच्या विनंतीबद्दल माहिती दिली. ट्रम्‍प हो देखील म्‍हणाले. परंतु शेवटी पत्रकारांना ‘काही प्रश्न आहेत का’, असे विचारले आणि पत्रकार परिषद पार पडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT