कोविड लॉकडाऊनचा चंद्राच्या पृष्ठभागावरही परिणाम; नवीन संशोधन काय सांगते?  File Photo
आंतरराष्ट्रीय

कोराेना 'लॉकडाऊन'चा चंद्रावरही झाला परिणाम!नवीन संशोधन काय सांगते ?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासह जगभरात २०२० पासून पुढील २ ते २.५ वर्षे कोरोनाने थैमान घातले होते. या काळात जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. याचा प्रभाव निसर्गावर पडल्‍याचे यापूर्वी स्‍पष्‍ट झाले अहे. आता काेराेना काळातील लॉकडाऊनचा प्रभाव चंद्रापर्यंत पोहोचला असल्याचे पुरावे भारतीय संशोधकांना मिळाल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

लॉकडाऊनच्या 'या' काळात तापमानात वाढ

रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मासिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात एप्रिल-मे 2020 च्या कडक लॉकडाऊन कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात असामान्य घट दिसून आली आहे.

अभ्यासातून 'ही' बाब आली समोर

भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे (पीआरएल) संशोधक दुर्गा प्रसाद आणि जी अंबिली यांनी 2017 आणि 2023 दरम्यान चंद्राच्या जवळच्या सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले. त्यांना आढळले की, लॉकडाऊन दरम्यान तापमान इतर वर्षांच्या तुलनेत 8-10 केल्विनने कमी झाले होते. यासाठी संशोधकांनी नासाच्या लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) कडील डेटाची मदत घेतली. पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज म्हणाले की, "आमच्या समूहाने केलेले हे महत्त्वाचे संशोधन आहे. हे संशोधन अगदी अद्वितीय आहे."

तापमान कमी होण्याची महत्त्वाची कारणे

लॉकडाऊनच्यावेळी जगभरातील सर्व कारखान्‍यांसह वायू प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक बंद हाेते. या काळात हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात लक्षणीय घट झाली होती. लॉकडाऊनमुळे पृथ्वीचे रेडिएशन देखील कमी झाले होते, असे संशोधकांचे मत आहे.

लॉकडाऊन संपले, तापमान पुन्हा वाढले

संशोधकांनी 12 वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी सात वर्षांचा (2017-2023) डेटा वापरला आहे. याचा अर्थ त्यांनी लॉकडाऊनच्या तीन वर्षांपूर्वी आणि तीन वर्षानंतरच्या तापमानाचा अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनात त्यांना असे आढळले की, 2020 मध्ये साइट-2 चे सर्वात कमी तापमान 96.2 के होते, तर 2022 मध्ये साइट-1 चे सर्वात कमी तापमान 143.8 के. बहुतेक साइट्सने २०२० मध्ये सर्वात कमी तापमान पाहिले; पण लॉकडाऊन संपताच 2021 आणि 2022 मध्ये चंद्रावरील उष्णता पुन्हा वाढू लागल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT