आंतरराष्ट्रीय

रिव्हॉल्व्हर प्रकरणात बायडेनपुत्र दोषी

Arun Patil

[author title="अनिल टाकळकर" image="http://"][/author]

विल्मिंग्टन (डेलावेअर) : रिव्हॉल्व्हर खरेदीच्या वेळी ड्रग्ज डिक्ट असल्याचे लपवल्याच्या आरोपांच्या खटल्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे चिरंजीव हंटर बायडेन आज दोषी ठरले. येथील फेडरल कोर्टात आठवडाभर चाललेल्या या खटल्यात बाराही ज्युरींनी आज एकमताने तीनही आरोपांबाबत बायडेन यांना दोषी ठरविले.

या खटल्यात हंटर बायडेन दोषी ठरल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हश मनी प्रकरणाच्या खटल्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष व निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हेही दोषी ठरले होते. अध्यक्षीय निवडणुकीच्या तोंडावर दोन्हीही प्रतिस्पर्धी उमेदवारांना फौजदारी खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः आरोपी आहेत तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यावर त्यांच्या मुलांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे

अमेरिकेच्या अध्यक्षाला शिक्षेतून माफी देण्याचा अधिकार आहे. मात्र कायद्यापुढे सर्व समान असल्याने हंटर हे आपले चिरंजीव असले तरी मी त्याला माफ करणार नाही, असे जो बायडेन यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

काय आहे प्रकरण?

* रिव्हॉल्व्हर खरेदी करताना गन डिलरला खोटी माहिती दिली
* फॉर्मवर आपण ड्रग्ज अ‍ॅडिक्ट नसल्याची खोटी माहिती दिली
* बेकायदेशीररीत्या तब्बल 11 दिवस हे रिव्हॉल्व्हर बाळगले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT