हल्क होगन ऊर्फ टेरी बोलेया 
आंतरराष्ट्रीय

Hulk Hogan passes away |WWE स्टार हल्क होगन ऊर्फ टेरी बोलेया यांचे निधन!

वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : अनोख्या स्‍टाईलमुळे जगभरात होते चाहते

Namdev Gharal

WWE star Hulk Hogan aka Terry Bollea passed away!

नवी दिल्‍ली : WWE चे स्‍टार व कुस्‍तीपूटू हल्‍क होगन यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. होगन योच मूळ नाव टेरी बोलेया (Terry Bollea) होते. डब्‍लूडब्‍लूइ च्या मैदानात हल्‍क होगन हिच खरी त्‍यांची ओळख होती. WWE ने त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनामुळे कुस्ती आणि WWE विश्वात शोककळा पसरली आहे.  गुरुवारी (२४ जुलै २०२५) सकाळी फ्लोरिडा येथील त्यांच्या निवासस्थानी कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 

WWE मध्ये ८०-९०च्या दशकातील सर्वात मोठा रेसलिंग स्टार म्हणून हल्क होगन यांची ओळख होती. रिंगमधील त्यांची उग्र शैली, आवेश, आणि त्याहूनही जास्त प्रसिद्ध असलेली त्यांची व्यक्तिमत्त्वाने त्यांना घराघरात पोहोचवले. केवळ कुस्तीपुरता मर्यादित न राहता, त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केले. चित्रपट व जाहिराातक्षेत्रात मुख्य प्रवाहातही स्वतःचं स्थान निर्माण केलं.

80 च्या दशकात हल्‍क यांनी वर्ल्ड रेसंलिंग फेडरेशन आताचे WWE ला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या खेळाच्या यशात हल्क होगन यांचा मोठा वाटा असून, त्यांच्यामुळेच या खेळाला जागतिक ओळख मिळाली. WWE चा चेहरा म्हणून ओळखले जाणारे होगन यांनी अनगिनत चाहते निर्माण केले. त्‍याची वेगळी स्‍टाईल फाइट व अनोखा अंदाज जगभरात चाहते होते.

त्याच्या सुरुवातीच्या काळात, तो पाच वेळा WWF चॅम्पियन होता , त्याचा १,४७४ दिवसांचा कारकिर्द रेसलमेनिया युगातील सर्वात मोठा खेळाडू ठरण्याचा मान हल्‍कने मिळवला होता. तो १९९० आणि १९९१ मध्ये सलग रॉयल रंबल सामने जिंकणारा पहिला कुस्तीगीर होता.

भव्य शरिरयष्‍टी व घोड्याच्या नालेसारख्या मिशा

भव्य शरीरयष्टीसाठी आणि त्याच्या ट्रेडमार्क घोड्याच्या नालाच्या आकाराच्या मिशा ही त्‍याची खास ओळख होगनने मध्ये रॉकी III मधील भूमिका केली नो होल्‍डस बॅरेड, सबबर्न कमांडो, मिस्‍टर नॅनी या चित्रपटांसह अनेक टेलिव्हीजन शोमध्ये अभिनय केला आहे. हल्क होगन यांच्या मागे पत्नी स्काय, माजी पत्नी लिंडा आणि दोन मुले ब्रूक व निक असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रात एक पर्व संपले आहे. WWE, सहकारी कुस्तीपटू, सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT