Huaweiने बनवलेला Mate XT हा जगातील पहिला ट्रिपल फोल्ड मोबाईल आहे.  Huawei
आंतरराष्ट्रीय

Iphone फाईट देणारा फोन आला! Huaweiचा ट्रिपल फोल्ड मोबाईलवर ग्राहकांच्या उड्या

Huawei चा ट्रिपल फोल्ड असणारा Mate XT हा फोन आज सादर होत आहे. या फोनच्या प्री ऑर्डरसाठी ३० लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोबाईल आणि टेक्नॉलॉजीतील आजची सर्वांत बलाढ्य कंपनी म्हणजे अॅपल होय. अॅपलने आयफोन १६ मंगळवारी लाँच केला. हा सोहळा एकीकडे सुरू असताना चीनच्या Huawei कंपनीने Mate XT हा तिहेरी फोल्ड (ट्रिपल किंवा ट्राय फोल्ड) असणारा फोन लाँच केला आहे. या फोनची प्री ऑर्डर शनिवारी सुरू झाली असून आतापर्यंत ३० लाख फोनसाठी मागणी नोंदवली गेली आहे. हा फोन आज दिवसभरात अधिकृतरीत्या लाँच होणार आहे. ट्रिपल फोल्ड असणारा आणि व्यावसायिकरीत्या उपलब्ध झालेला हा जगातील पहिला फोन ठरला आहे.

Mate XTची विक्री केव्हा सुरू होणार?

अॅपलने आयफोन १६, स्मार्ट वॉच आणि एअर पॉड हे प्रॉडक्ट आज लाँच केले. तर दुसरीकडे Huawei ने चीनमधील सोशल मीडिया Weibo वर सोमवारी या ट्रिपल फोल्ड फोनचा टीझर रिलिज केला. Mate XT असे या फोनचे नाव आहे. हा फोन २० सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनची किंमत लॉचिंग वेळी जाहीर केली जाणार आहे.

अॅपलसोबत स्पर्धा

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात Huaweiने Mate 60 प्रो हा फोन सादर केला. या फोनमध्ये अत्याधुनिक चिप देण्यात आली आहे. Huaweiवर अमेरिकेने बरीच बंधने लादलेली आहेत, त्यामुळे ही कंपनी स्वतःच अत्याधुनिक चिप बनवू शकणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांचा होता. पण यालाच चकवा देत Huaweiने Mate 60 हा फोन सादर केला. त्यानंतर Pura 70 ही फोनची मालिकाही सादर केली. त्यामुळे चीनमध्ये Huawei ही कंपनी Appleची तगडी स्पर्धक बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT