Saudi Arabia Refinery Attack | हूती बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या रिफायनरीवर हल्ला 
आंतरराष्ट्रीय

Saudi Arabia Refinery Attack | हूती बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या रिफायनरीवर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

तेल अवीव/तेहरान/वॉशिंगटन डीसी : सौदी अरेबियाच्या जजान येथील सौदी अरामको रिफायनरीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. हूती बंडखोरांनी हा दावा केला आहे.जजान रिफायनरी ही सौदी अरेबियाची पाचवी सर्वांत मोठी तेल रिफायनरी मानली जाते. या रिफायनरीची क्षमता दररोज सुमारे चार लाख बॅरल कच्चे तेल प्रोसेस करण्याची आहे. लाल समुद्राच्या किनारी असल्यामुळे ती सौदी अरेबियाच्या ऊर्जा आणि तेल निर्यात नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहे.

सौदी अरेबियाने नुकतेच येमेनमधील हूती ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते, त्यानंतर हा हल्ला घडवून आणला आहे. या कारवाईचा बदला म्हणून हूती बंडखोरांनी सौदीच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना (एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर) लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर रिफायनरीमधून आग आणि धूर निघत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. असे असले तरी, सौदी सरकार किंवा अरामकोने रिफायनरीवर थेट क्षेपणास्त्र पल्ल्याची किंवा कोणत्याही मोठ्या नुकसानीची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT