Himanshu Bhau File Photo
आंतरराष्ट्रीय

Himanshu Bhau Arrest: लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू; कोण आहे मोस्ट वॉन्टेड हिमांशू भाऊ? अमेरिकेत FBI कडून अटक

हत्या, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांत भारतात मोस्ट वॉन्टेड असलेला गँगस्टर हिमांशू भाऊ याला अमेरिकेतील 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (FBI) ने अटक केली आहे.

मोहन कारंडे

Himanshu Bhau FBI arrest:

नवी दिल्ली : हत्या, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांत भारतात मोस्ट वॉन्टेड असलेला गँगस्टर हिमांशू भाऊ याला अमेरिकेतील 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (FBI) ने अटक केली आहे. हिमांशू भाऊ हा तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. तो दिल्ली आणि हरियाणा पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता.

इंटरपोलनेही त्याच्याविरुद्ध 'रेड कॉर्नर नोटीस' जारी केली होती. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्याला ताब्यात घेण्याबाबत आणि भारतात प्रत्यार्पित करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

एल्विश यादवच्या घरावर झालेल्या गोळीबारात आरोपी

हिमांशू भाऊ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर हत्या, अपहरण आणि खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांची गुन्हेगारी कृत्ये हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेली आहेत. एल्विश यादवच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी हिमांशू भाऊच्या टोळीने स्वीकारली होती.

पोलिस तपासानुसार, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटा पासपोर्ट मिळवला आणि त्याद्वारे तो भारतातून पळून गेला. तो पोर्तुगालमध्ये लपून बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत होता. दिल्लीतील कुख्यात नीरज बवाना आणि नवीन बाली टोळ्यांशी मिळून काम करत असल्याचेही समोर आले आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी वैर

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा वाढता प्रभाव मोडीत काढण्यासाठी ज्याचा म्होरक्या सध्या तिहार तुरुंगात आहे हिमांशू भाऊने दिल्ली-एनसीआर आणि हरियाणा परिसरात स्वतःचे दहशत निर्माण करणारे जाळे उभारले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT