पुढारी ऑनलाईन न्यूज : नेदरलँडमधील ड्रेन्टस् मुझिअममधून ४५० इसव सन पूर्व काळातील एक सोन्याचे शिरस्त्राण व ब्रेसलेट चोरीला गेले आहे. २५ जानेवारी रोजी ही घटना घडली. हे (शिरस्त्राण) हेल्मेट व ब्रेसलेट सोन्याचे असून जवळपास २५०० वर्षापूर्वीचे आहे. इतिहासकालिन गेटो- डेशिअन या राजवटीतील मौल्यवान अशा या दोन्ही वस्तू आहेत. (Ancient Artifacts Stolen )
नॅशनल हिस्ट्री म्युझिअम ऑफ रोमानिया यांच्याकडून कर्ज स्वरुपात प्रदर्शशनासाठी हे ऐवज नेदरलँडने घेतले होते. बुचरेस्ट शहरातील ड्रेन्ट मुझिअममध्ये प्रदर्शनात या वस्तू ठेवल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी सांगितले की ही चोरी करण्यासाठी चोरांनी म्युझिअमचा दरवाजा स्फोटाने उडवला. ‘म्युझिअमच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे’ अशी प्रतिक्रीया ड्रेन्ट मुझिअमचे संचालक हॅरी ट्युपान यांनी म्हटले आहे. १७३ वर्षाच्या मुझिअमच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे असे ते म्हणाले. १९९० च्या दशकात डेशिअन किल्ल्यामधून अनेक सोन्याचे ऐवज लूटून नेले होते. यापैकी या दोन वस्तू होत्या. यांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
दरम्यान सीएनएन या वाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणर डच पोसिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नेदरलँडमधील हेअरग्रॉड या शहरातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण चोरीला गेलेले हे ऐवज अजूनही हस्तगत करता आलेले नाहीत. या तिघांपैकी डग्लस चेल्सी वेन्सट्रे व बर्नाड झीमन या दोघांबरोबर एक महिलेलाही ताब्यात घेतले आहे.