याहा सिनवर File Photo
आंतरराष्ट्रीय

हमास चिफ याहा सिनवर ठारः इस्‍त्रायल ने गाझापट्टीत केलेल्‍या हल्‍ल्‍यात झाला शेवट

Israel Hamas conflict|आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी म्‍हणून होती ओळखः ७ ऑक्‍टोबर रोजी इस्‍त्रायलवरील हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाईंड

पुढारी वृत्तसेवा

तेल अवीवः वृत्तसंस्‍थाः इस्‍त्रायल ने केलेल्‍या एका कारवाईमध्ये हमासचा सर्वोच्च नेता याहा सिनवर हा ठार झाल्‍याचा दावा इस्‍त्रायलच्या संरक्षण अधिकऱ्यांनी केला आहे. गुप्तहेर संस्‍था याची खातरजमा करत आहे. तसेच ७ ऑक्‍टोबर रोजी इस्‍त्रायलवर झाालेल्‍या मोठ्‌या हल्‍ल्‍याला सिनवरच जबाबदार होता. यामध्ये १२०० इस्‍त्रायली नागरिक ठार झाले होते. सिनवर हा अलिकडेच ७ महिन्यांपूर्वी हमासचा चिफ झाला होता. अमेरिकेनही २०१५ साली त्‍याला आंतराष्‍ट्रीय दहशतवादी घोषीत केले होते.

हमासबरोरबच्या दिर्घकालीन संघर्षातील मोठे यश

याहा सिनवर हा ६१ वर्षीय दहशतवादी असून इस्‍त्रायलच्या प्रमुख शस्‍त्रूंपैकी एक होता. त्‍याचा खात्‍मा म्‍हणजे इस्‍त्राययलची हमास बरोबर सुरु असलेल्‍या दिर्घकालीन संघर्षातील एक मोठे यश आहे. १९९८ मध्ये इस्‍त्रायलने त्‍याला ताब्‍याात घेतले होते पण २०११ साली पॅलेस्‍टाईनबरोबर झालेल्‍या कैदी प्रत्‍यार्पण करारार्तंगत त्‍याला हमासच्या ताब्‍यात देण्यात आले होते.

बंदुकीच्या जीवावरच पॅलेस्‍टिन निर्मीतीचे स्‍वप्न

याहा सिनवर हा १९८० च्या दरम्‍यान मुस्‍लिम ब्रदरहुड या संघटनेत सामिल झाला होता. कॉलेजच्या दिवसात गाझामधील इस्‍लामिक युनिर्वसिटीमध्ये शिकत असताना इस्‍त्रायल विरोधात निदर्शने करताताना त्‍याला पकडण्यात आले होते. त्‍यानंतर तो हमास संघटनेत सामिल झााला. हमासमध्ये तो अंतर्गत संरक्षरण व्यवस्‍था पाहणे तसेच इस्‍त्रायलच्या एजटंना शोधून त्‍यांना यमसदनी धाडणे ही त्‍याची प्रमुख कामे होती. सिनवर यांच्या मते बंदुकीच्या बळावरच पेलेस्‍टिन राष्‍ट्र खऱ्या अर्थाने आकार घेऊ शकते.

सिनवरचे वास्‍तव्य होते टनेल नेटवर्कमध्येचः क्रुरकर्मा म्‍हणून ओळख

याहा सिनवर हा हमासचा प्रमुख नेता असून गेल्‍या काही वर्षात त्‍याला सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग दिसलेला नाही. त्‍याचे वास्‍तव्य नेहमीच गाझापट्टीमध्ये तयार केलेल्‍या टनेल नेटवर्कमध्येच होते . गुप्त राहूनच सिनवर आपल्‍या दहशतवादी कारवाया घडवून आणत असे. त्‍याच्या क्रुरतेचे अनेक किस्‍से प्रसिद्ध आहेत. इस्‍त्रायलशी संबधित असणाऱ्यांना अतिशय क्रुरतेने शिक्षा तो देत असे तसेच इस्‍त्रायलला मदत केल्‍याच्या संशयावरुन पॅलेस्‍टिनी नागरिकांनाही अत्‍यंत क्रुरपणे तो ठार करत असे.

इस्‍त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

दरम्‍यान इस्‍त्रायलचे संरक्षणमंत्री योवा गॅलंट यांनी एक्‍सवर लिहलेली पोस्‍टमध्ये म्‍हटले आहे की ‘ इस्‍त्रायलचे शत्रू आम्‍ही चांगलेच ओळखतो आणि ते आमच्यापासून लपून राहू शकत नाहीत. तुम्‍ही तुमच्या शत्रूचा कायम पाठलाग करत राहणे आणि तो समोर याचच्या आता तुमची तलावार सज्‍ज ठेवणे’ अशा शब्‍दात त्‍यांनी शत्रूंना इशारा दिला आहे.

डीएनए चाचणीतून पटवणार ओळख 

इस्‍त्रायल संरक्षण दलाने गाझा मध्ये राबविलेल्‍या ऑपरेशनमध्ये ३ दहशदवादी ठार झाले होते. ज्‍या इमारतीमध्ये लपलेल्‍या तीन दहशतवाद्यांना आम्‍ही ठार केले होते. त्‍यापैकी एक याह सिनवर असण्याची दाट शक्‍यता आहे. एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या तीन दहशदवाद्याचे मृतदेह आम्‍ही ताब्‍यात घेतले असून त्‍यांची डिएनए चाचणी होणार आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT