आंतरराष्ट्रीय

Hajj pilgrims Death | हज यात्रेत मृतांची संख्या एक हजारच्या पुढे; 68 भारतीय

Shambhuraj Pachindre

रियाध : यंदाच्या हज यात्रेत उष्माघाताने मरण पावलेल्यांची संख्या एक हजाराहून अधिक झाली असून, त्यात 68 भारतीयांचा समावेश आहे. विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सौदीत यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 50 अंशांच्या वर गेले असून, त्याचा फटका विविध देशांतून आलेल्या यात्रेकरूंना बसला आहे. उष्णतेच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या गुरुवारी एक हजारांच्या पुढे गेली असून त्यात 68 भारतीय हज यात्रेकरूंचा समावेश आहे. गुरुवारी एकाच दिवसात 58 इजिप्शिन भाविक मरण पावल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एकूण दहा देशांच्या एक हजार 81 भाविकांनी हज येथे प्राण गमावले आहेत. मक्केतील ज्या ग्रँड मशिदीत भाविकांची प्रचंड गर्दी होत असते, तेथे गुरुवारी 51.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. (Hajj pilgrims Death)

मरण पावलेल्या भारतीय यात्रेकरूंमध्ये 13 जण केरळचे असून, अनेक भारतीय बेपत्ता आहेत. दुसरीकडे इजिप्त, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्यूनिशिया या देशांतील भाविक मरण पावल्याचे सौदी अरेबियातील प्रशासनाने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT