आंतरराष्ट्रीय

Amir Hamza | हाफिज सईदचा साथीदार आमीर हमजावर गोळीबार

प्रकृती गंभीर; लाहोरमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

लाहोर; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हाफिज सईदच्या नेतृत्वाखाली त्याने ‘लष्कर’ला इतर दहशतवादी गटांशी जोडण्याचे काम केले. तो लष्करशी संबंधित एका चॅरिटी संस्थेचे नेतृत्व करत होता आणि लष्करच्या युनिव्हर्सिटी ट्रस्टच्या बोर्डातही त्याचा समावेश होता.

एका वर्षातील दुसरा हल्ला

गेल्या वर्षभरातील आमीर हमजावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT