काबुल/लाहोर: वृत्तसंस्था : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा तीव्र संघर्ष उसळला असून, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जोरदार चकमकी सुरू आहेत. सीमेवर रणगाडे आणि सैन्याची मोठी हालचाल दिसून आली. या संघर्षात मोठी जीवितहानी आणि नुकसान झाल्याचा दावा दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी दोन्ही बाजूंनी 48 तासांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. अफगाणिस्तानने केलेल्या विनंतीवरून ही शस्त्रसंधी करण्यात आली.
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष; रणगाड्यांची हालचाल दिसली.
स्पिन बोल्डक येथे 15 अफगाण नागरिक ठार, अनेक जखमी
पाकिस्तानी सैन्याचा तालिबानच्या चौक्या व रणगाडे नष्ट करण्याचा दावा
अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या अनेक चौक्या व टँक ताब्यात घेतले.
बुधवारी काबुल येथील अधिकार्यांनी ‘एएफपी’ वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या ताज्या संघर्षात किमान 15 अफगाण नागरिक मारले गेले आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानची मोठी हानी केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानने अनेक लष्करी चौक्या, रणगाडे जप्त केल्याचा पाकच्या लष्करी आस्थापनांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.