Strait of Hormuz | आखातात हल्ले सुरूच; ‘होर्मुझ’वर अमेरिकेचा टोल? 
आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz | आखातात हल्ले सुरूच; ‘होर्मुझ’वर अमेरिकेचा टोल?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन/तेहरान/दुबई; वृत्तसंस्था : अमेरिकेने इराणवर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने सोमवारी सकाळी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. या आक्रमणामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षित वाहतुकीसाठी जहाजातील साहित्‍य किमतीवर २० टक्‍के टोल आकारू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ते म्हणाले, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी जवळपास ९० टक्के मृतावस्थेत आहेत.

अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापारासाठी एक अत्यंत महत्त्वाचा सागरी कॉरिडॉर आहे आणि यावर इराणचे कोणतेही नियंत्रण नाही.

होर्मुझवर अमेरिका ताबा घेणार

होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका ताबा मिळवेल. त्याचे पालकत्व घेऊन त्यातील सुरक्षित वाहतुकीसाठी जहाजातील साहित्‍य किमतीवर २० टक्‍के टोल आकारू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका ताबा मिळवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कच्‍चे तेल महागले; प्रतिबॅरल ७८ डॉलर

दुबई : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आखती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने जोरदार हल्ले केले. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल वाहतूक ठप्प झाली. यामुळे सोमवारी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. लंडन बाजारात ब्रेंट क्रूडचे दर ४.५ टक्क्यांनी वाढून प्रतिबॅरल ७८.२३ डॉलर्सवर पोहोचले आहेत, तरीही ते ८० डॉलर्सच्या खालीच आहेत. ‘गोल्डमन सॅक्स’च्या विश्लेषकांनुसार, आखातातील हल्ल्यांमुळे पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT