आंतरराष्ट्रीय

गुगलचा चीनवर व्हिडिओ स्ट्राइक, २५०० यूट्यूब चॅनेल केले डिलीट

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सर्च इंजिन गुगलने चीनशी संबंधित २ हजार ५०० यूट्यूब चॅनेल डिलीट केली आहेत. हे चॅनेल्स दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे व्हिडिओ शेअरींग प्लॅटफॉर्म यूट्यूबवरून हे चॅनल्स हटवले आहेत, अशी माहिती गुगलने दिली आहे. ही कारवाई चीनसाठी काम करणा-या या चॅनल्सच्या तपासणीचा एक भाग असून हे यूट्युब चॅनल्स एप्रिल ते जून दरम्यान हटवण्यात आल्याचीही माहिती गुगलने दिली आहे. 

चीनचे हे यूट्यूब चॅनल्स साधारणपणे स्पॅमी आणि बिगर-राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. मात्र, यात एक छोटासा भाग राजकारणाशी संबंधित होता.  गुगलने या चॅनेलची नावे उघड केलेली नाहीत. आपल्या त्रैमासिक बुलेटिनमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. तसेच गुगलने सांगितले की, ट्विटरवर अशीच दिशाभूल करणारी माहिती पसरविणार्‍या लिंक्स पाहिल्या गेल्या. त्यानंतर याबाबत माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT