लंडन : युरोपमधील एका देशात सोन्याचा जणू खजिना सापडला आहे. या देशात 1.3 मैल लांबीची सोन्याची खाण सापडली आहे. त्यामुळे हा छोटासा देश अक्षरशः मालामाल झाला आहे. ही घटना युरोपच्याही श्रीमंतीत भर घालणारी आहे. हा भाग युरोपमधील सुप्रसिद्ध गोल्ड लाईन बेल्टचा एक भाग आहे.
उत्तर स्वीडनमधील आयडा क्षेत्रात शास्त्रज्ञांना ही सोन्याची खाण सापडली. या बेल्टमध्ये अजून मोठी खनिज संपदा हाती लागण्याची शक्यताही वाढली आहे. हे नवीन संशोधन स्वीडन देशातील उत्तर भागात झाले. तिथे आयडा नावाचे एक ठिकाण आहे. हे स्टॉकहोमपासून जवळपास 630 किलोमीटर उत्तरेकडील ठिकाण आहे. येथून पहिली आणि जुनी सोन्याची खाण ही 4 किलोमीटर दूर आहे. त्याच्याजवळच सोन्याची ही नवीन खाण पाहायला मिळाली. या नवीन खाणीमुळे स्वीडनला ‘सोन्याचे दिवस’ आले आहेत. यामुळे देशाच्या खजिन्यात मोठी भर पडणार आहे.