आंतरराष्ट्रीय

हिमनद्या वितळण्याचा वेग तिप्पट; शास्त्रज्ञांनी दिला जगबुडीचा इशारा

दिनेश चोरगे

लंडन; वृत्तसंस्था :  ग्रीनलँड या बर्फाच्छादित देशातील हिमनद्या वितळण्याचा वेग गेल्या 20 वर्षांत तिप्पट झाला असून, बर्फ वितळून पृथ्वी जलमय होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असून, ग्रीनलँडमध्ये त्याचे सर्वाधिक परिणाम दिसत आहेत. वितळलेल्या हिमनद्यांच्या पाण्यामुळे लगतचे अनेक देश पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पोर्टस्माऊथ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट, भूगोल आणि भूगर्भशास्त्रातील डॉ. क्लेअर बोस्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमनद्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वितळत आहेत. हिमनद्या आणि वितळलेल्या बर्फाचे एकूण प्रमाण पाहिले, तर ते अंदाजापेक्षा जास्त असल्याचे संशोधनात समोर आले आहे. पृथ्वीवरील बर्फ वितळल्यास जगबुडी होण्याचा धोका आहे. जगबुडी होणे म्हणजे संपूर्ण पृथ्वी जलमय होणे. जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या अहवालानुसार, ग्रीनलँडच्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत.

SCROLL FOR NEXT