आंतरराष्ट्रीय

त्या दोघींनी लिंग परिवर्तन करून घेतला मोकळा श्वास!

Pudhari News

ब्राझील : पुढारी ऑनलाईन

घरी दोन जुळी मुलं… हसतं खेळतं कुटुंब पण ही मुलं जसजशी मोठी होतील तसतशी त्यांना आपण वेगळं असल्याची जाणीव होत होती. उच्चशिक्षण घेत असताना त्यांना आपण दिसायला मुलगा असलो तरी आतून मुलगी असल्याचे जाणवले आणि शस्त्रक्रिया करून घेण्याचा निश्चय केला. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघींनी पाच पाच तासांच्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेत घुसमटीला वाट करून दिली.

वाचा : इचलकरंजीत खळबळ, २४ तासांत २ खून

दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये राहणाऱ्या दोन जुळ्या बहिणींनी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणाऱ्या या जगातील एकमेव आहेत.

मायला आणि सोफिया अशी या जुळ्या बहिणींची नावे असून त्या ब्राझीलमधील ब्लूमेनोऊमध्ये राहतात. या दोघींनाही जन्मजात कुटुंबीय मुलगा मानत होते. पण त्यांना आतून आपण काहीतरी वेगळे असल्याचे जाणवत होते. या तणावातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला तो त्यांच्या आजोबांनी. ज्यावेळी या दोघींनी शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा  त्यांच्या आजोबांनी २० हजार डॉलर्सची संपत्ती विकून शस्त्रक्रियेसाठी पैसे उभे केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जुळ्या भावंडांनी एकाच वेळी शस्त्रक्रिया करून घेण्याचा हे पहिलेच उदाहरण असेल. 

वाचा : आई बॉम्बस्फोटात बेशुद्ध; रक्ताने भिजलेल्या पोटच्या दोन लेकरांची आर्त हाक 'आई ऊठ ना' (video)

ब्लूमेनाऊच्या ट्रान्सजेंडर सेंटरचे डॉक्टर होजे कार्लोस मार्टिन्स यांनी या बहिणींवर एका दिवसाच्या अंतराने पाच तास दीर्घ चालणारी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर ते म्हणाले, 'ही जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे. या दोघी बहिणी जन्मता पुरुष असल्याचे घरच्यांनी मानले होते. मात्र, आता त्यांचा जणू पुनर्जन्म होऊन स्त्री झाल्या आहेत.' शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्याने मायला आणि सोफिया यांनी  एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मायला ही अर्जेंटिनामध्ये मेडिकलची विद्यार्थिनी आहे. ती म्हणाली, 'माझे शरीरावर प्रेम होते. पण माझे इंद्रिय मला आवडत नव्हते. मी नेहमी देवाला प्रार्थना करत होतेकी, मला मुलगी बनव.' 

वाचा : उन्हाने होरपळून काढणाऱ्या सौदी अरेबियाच्या वाळवंटात बर्फवृष्टी! ५० वर्षांतील सर्व विक्रम मोडले

सोफिया आणि मायला या दोघी लहानपणी लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या होत्या. या कठीण प्रसंगात दोघींनी एकमेकींना साथ दिली होती. त्यांना त्यांची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी नेहमी पाठिंबा दिला. त्यांच्या आजोबांनी एक लाख रियास म्हणजे २० हजार डॉलर्सची संपत्ती विकून या दोघींवर शस्त्रक्रिया केली.

वाचा : 'भारताला आमच्याशी बोलायला तरी सांगा!'

SCROLL FOR NEXT