France Bans Social Media | फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी 
आंतरराष्ट्रीय

France Bans Social Media | फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी

वय पडताळणीची जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांवर

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस; वृत्तसंस्था : फ्रान्सने १५ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे. युरोपियन युनियनमधील अशा प्रकारची सर्वसमावेशक बंदी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला आहे. फ्रान्सच्या संसदेने हा प्रस्ताव २७९ विरुद्ध ८१ मतांनी मंजूर केला.

फ्रान्सच्या डिजिटल व्यवहार मंत्री अ‍ॅन ले हेनान्फ म्हणाल्या, वय पडताळणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांची असेल. वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवला जाईल. या कायद्यात शैक्षणिक वेबसाइटस्‌, ऑनलाईन विश्वकोश आणि वैज्ञानिक प्लॅटफॉर्मना सूट दिली आहे. तसेच मुलांवर किंवा पालकांवर कोणताही दंड लावण्याची तरतूद नाही.

सरकारला हा कायदा १ सप्टेंबरपासून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करायचा आहे. सप्टेंबरपासून १५ वर्षांखालील मुलांना नवीन खाती उघडता येणार नाहीत, तर आधीपासून असलेली खाती जानेवारी २०२७ पासून बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT