तेहरान : इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवरील इमारती आणि भुयारी मार्गांच्या प्रवेशद्वारांना अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला तळ. 
आंतरराष्ट्रीय

US Israel airstrikes Iran | इराणची चार क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रे उद्ध्वस्त

किमान 29 प्रक्षेपण स्थळांना केले लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इस्रायलने गेल्या चार आठवड्यांत केलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. वॉशिंग्टन पोस्टने उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे केलेल्या विश्लेषणानुसार, इराणमधील क्षेपणास्त्र उत्पादनाशी संबंधित 4 प्रमुख केंद्रे आणि किमान 29 प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तेहरानजवळील खोजीर, पारचिन, हाकिमीयेह आणि शाहरूद यांसारख्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे क्षेपणास्त्रांसाठी लागणारे घन आणि द्रव इंधन तयार करण्याची इराणची क्षमता तात्पुरती ठप्प झाली आहे.

खोजीर संकुलात तर तब्बल 88 इमारती जमीनदोस्त झाल्या आहे. यामुळे इराणला नजीकच्या काळात नवीन क्षेपणास्त्रे तयार करणे कठीण जाणार असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. या लष्करी मोहिमेत केवळ उत्पादनच नव्हे, तर इराणच्या क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेवरही प्रहार करण्यात आला आहे. इराणने डोंगरांच्या आडोशाने तयार केलेल्या अनेक भुयारी तळांची प्रवेशद्वारे हवाई हल्ल्यांनी नष्ट केली आहेत. यामुळे तेथे ठेवलेली क्षेपणास्त्रे बाहेर काढणे कठीण झाले आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी, या हल्ल्यांमुळे शेजारील देशांवरील इराणच्या प्रतिहल्ल्यांचे प्रमाण 90 टक्क्यांनी घटले आहे, असा दावा केला आहे. मात्र, इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झालेला नाही. इराण आजही काही प्रमाणात हल्ले करत असून, त्यांच्याकडे असलेले मोबाईल लाँचर्स आणि विदेशी पुरवठा साखळीच्या मदतीने ते पुन्हा आपली शक्ती उभारण्याचा प्रयत्न करू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT