रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन. File Photo
आंतरराष्ट्रीय

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट

राजधानी मॉस्कोमधील 'एफएसबी' मुख्यालयाजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मॉस्कोमधील एफएसबी मुख्यालयाजवळ राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील लिमोझिन कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कार पूर्णपणे जळून खाक झाली, असे वृत्त 'EuroWeekly'ने दिले आहे. कारमधील स्फोटाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही दुर्घटना आहे की घातपात, याचा तपास केला जात आहे.

कारमध्ये अचानक स्फोट

मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोमधील 'एफएसबी' गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाच्या उत्तरेस पुतिन यांच्या ताफ्यातील एका लिमोझिन कारमध्ये अचानक स्फोट झाला. या घटनेतील सीसीटीव्‍ही फुटेजनुसार आग प्रथम कारच्या इंजिनमध्ये लागली आणि नंतर ती आतील भागात पसरली. गाडीला आग लागताच, जवळच्या रेस्टॉरंट्स आणि बारमधील कर्मचारी मदतीला धावले. कार कोण चालवत होते, याबाबत माहिती देण्‍यात आलेली नाही. दरम्‍यान, पुतिन यांना २,७५,००० पौंड वजनाची लिमोझिन कार ही आवड्या कारपैकी एक आहे. त्यांना ही कार उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनाही भेट दिली आहे.

पुतिन यांच्यावर हल्ल्याची भीती

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, क्रेमलिनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. अलिकडेच रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणाच्या ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर, मॉस्कोमध्ये पुतिन यांच्या भाषणाच्या ठिकाणाजवळ बॉम्ब शोधण्यासाठी एफएसओ अधिकारी गटारांचे दरवाजे आणि कचऱ्याचे ढिगारे उघडताना दिसले. क्रेमलिनच्या अहवालानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात आली.

पुतीन यांचा लवकर मृत्‍यू होईल : झेलेन्स्कींनी केला होता दावा

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतीन युरोपियन महासंघाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण यांचा लवकर मृत्‍यू होईल. यानंतर रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येईल, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच केला आहे. माध्‍यमांशी बोलताना झेलेन्‍स्‍की म्‍हणाले होते की, आम्‍ही केलेल्‍या शांतीच्या प्रयत्नांनंतरही रशियाने युद्ध सुरु ठेवले आहे. रशिया हे युद्ध सुरू ठेवू इच्छित आहे. ते लांबवत आहे. आपल्याला त्‍यांच्‍यावर दबाव आणावा लागेल. यानंतर युद्ध खरोखरच संपेल. अमेरिकी मध्यस्थीनंतर गेल्या आठवड्यात केलेल्या युद्धविरामानंतरही ड्रोन हल्ले सुरूच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT