फ्रान्समधील मार्सेल येथील रशियन वाणिज्य दूतावासात आज (दि.२४) स्‍फोट झाला.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

फ्रान्समधील रशियन वाणिज्य दूतावासात स्फोट!

रशियाने व्‍यक्‍त केला दहशतवादी हल्ल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फ्रान्समधील मार्सेल येथील रशियन वाणिज्य दूतावासात आज (दि.२४) स्‍फोट झाला. हा दहशतवादी हल्ला असावा. स्फोटाच्या ठिकाणी सुमारे तीस अग्निशमन दलाचे जवान पोहोचले, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्‍हटलं आहे.

रशियन वृत्तसंस्था 'टास' फ्रान्समधील एका वृत्तसंस्‍थेच्‍या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, या घटनेत कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. अज्ञात व्यक्तींनी वाणिज्य दूतावासाच्या बागेत दोन पेट्रोल बॉम्ब फेकले. घटनास्थळाजवळ एक चोरीची कारही सापडली आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली चौकशीची मागणी

रशियाने या घटनेची तात्काळ आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रशियन सुविधांची सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी दिली. आम्ही फ्रान्सकडून या घटनेची तात्काळ आणि सखोल चौकशी करण्याची आणि परदेशात रशियाच्या सुविधांची सुरक्षा वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

यापूर्वी फ्रान्समध्येही चाकू हल्ल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि तीन जण जखमी झाले होते. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याचे वर्णन इस्लामिक दहशतवाद असे केले. जर्मन सीमेजवळील मुलहाऊस येथे घडलेल्या या घटनेत एका पोर्तुगीज नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेत सात पोलिस अधिकारीही जखमी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT