आंतरराष्ट्रीय

गुगलला दणका; युरोपीय संघाकडून 34 हजार कोटींचा दंड!

Pudhari News

ब्रुसेल्स: पुढारी ऑनलाईन

जगातील सर्वात लोकप्रिय आणि अव्वल क्रमांकाचे सर्च इंजिनला युरोपियन युनियनने (UE) दणका दिला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचा बेकायदेशीर वापर करून सर्च इंजिनला फायदा करवून घेतल्याप्रकरणी UEने 4.43 बिलियन युरो म्हणजेच 34 हजार 308 कोटी रुपयांचा दंड केला आहे. 

गुगलने अँड्रॉईडचा वापर स्वत:च्या सर्च इंजिनचा फायदा करण्यासाठी केला. युरोपियन युनियनच्या ऐंटीट्रस्ट नियमानुसार हे बेकायदेशीर आहे. गुगलने जर 90 दिवसात हा प्रकार थांबवला नाही तर त्यांना अल्फाबेटनुसार होणाऱ्या उत्पन्नावर प्रत्येक दिवशी 5 टक्क्यांनी दंड भरावा लागेल असे, आयोगाच्या अध्यक्ष मारग्रेथ वेस्टेजर यांनी सांगितले. 

युरोपीय संघाने केलेल्या या दंडावर याचिका दाखल करणार असल्याचे गुगलचे प्रवक्ते अल वर्नी यांनी सांगितले. अँड्रॉईड वापरणाऱ्यांना अधिक पर्याय आणि चांगली सुविधा देण्यासाठी याचा उपयोग केला जातो, असे ते म्हणाले. 

गुगलला युरोपियन युनियनकडून दंड होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी गुगलला 2.4 अब्ज युरो दंड करण्यात आला होता. यावेळी मात्र दंडाची रक्कम दुप्पट आहे. UEकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे ट्रेड वॉर आणखी वाढण्याचा धोका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच युरोपमधील स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लावले आहे.  

युरोपीयन युनियनचे आयुक्त वेस्टजेर यांनी हा निर्णय जाहीर करण्याआधी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना फोनवरून कल्पना दिली होती. त्या म्हणाल्या की, स्मार्टफोनमध्ये क्रोम ब्राऊझर असलेच पाहिजे असा दबाव गुगलकडून फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर टाकला जातो. काही अॅप्सना परवानगी देण्यासाठी गुगल सर्च करावे लागते. युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या फोनमध्ये गुगल सर्च आणि क्रोम आधीपासूनच इंस्टॉल असते.  

धक्कदायक बाब म्हणजे गुगल सर्च इंस्टॉल करण्यासाठी गुगल फोनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पैसे देखील देते. या सर्व प्रकरणावर वेस्टेजर यांनी घेतलेल्या निर्णयावर युरोपमधील अनेक देशांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर वॉशिंग्टनकडून मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. युरोपातील इंटरनेट सर्चवर सिलिकॉन व्हॅलीचे वाढत जाणारे प्रभुत्व यावर  ब्रसेल्सकडून सातत्याने टीका केली जात आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT