‘अश्लील कंटेंटला परवानगी नाही’ Grok वादावर Elon Musk यांच्या X प्लॅटफॉर्मचा मोठा निर्णय (file photo)
आंतरराष्ट्रीय

‘अश्लील कंटेंटला परवानगी नाही’ Grok वादावर Elon Musk यांच्या X प्लॅटफॉर्मचा मोठा निर्णय

एक आठवडा आधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आक्षेपार्ह कंटेंटबाबत पत्र पाठवले होते.

पुढारी वृत्तसेवा

elon musk x blocks content will delete 600 accounts over grok obscene images

पुढारी ऑनलाईन :

Elon Musk यांच्या X प्लॅटफॉर्मने अश्लील कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. X ने 3,500 पोस्ट्स ब्लॉक केल्या असून 600 अकाउंट्स डिलीट केले आहेत. ही कारवाई अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा एक आठवडा आधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आक्षेपार्ह कंटेंटबाबत पत्र पाठवले होते. त्‍यावर आता X प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह कंटेंटला परवानगी दिली जाणार नाही आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम केले जाईल.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने कंटेंटबाबत झालेली चूक मान्य केली असून, भारताच्या कायद्यांनुसार काम करण्याचे आश्वासन दिले आहे. X प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह कंटेंटबाबत केंद्र सरकारने दखल घेतल्यानंतर, संबंधित कंटेंटवर कारवाई करत तो ब्लॉक करण्यात आला आहे.

X ने एकूण 3,500 पोस्ट्स ब्लॉक केल्या असून 600 अकाउंट्स कायमस्वरूपी हटवले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, X आता आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला परवानगी देणार नाही आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार आहे.

ही कारवाई त्या घटनेनंतर एका आठवड्याने करण्यात आली आहे, जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने X प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह कंटेंटची नोंद घेतली होती. मागील काही दिवसांपासून X वर फिरत असलेल्या अश्लील कंटेंटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक अकाउंट्स Grok AI चा वापर करून अश्लील कंटेंट तयार करत होते, ज्यावर अनेकांनी टीका केली होती.

Grok AI म्हणजे काय?

Grok हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट आहे, जो Elon Musk यांच्या xAI कंपनीने विकसित केला आहे. हा X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच स्वतंत्र अ‍ॅपद्वारे वापरता येतो. वापरकर्ते टेक्स्ट कमांड किंवा व्हॉइस प्रॉम्प्टद्वारे याचा उपयोग करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT