डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्‍या गोळीबार प्रकरणी अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाचे प्रमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी एलन मस्‍क यांनी केली आहे. Twitter
आंतरराष्ट्रीय

ट्रम्‍प यांच्‍यावर गोळीबार : एलन मस्क यांनी केली 'ही' मागणी

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. या घटनेने जगभरात खळबळ माजली आहे. जगातील श्रीमंत उद्‍योगपती एलन मस्‍क यांनी अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाचे प्रमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली आहे. एलन मस्कही ट्रम्प यांच्या समर्थनात उतरले आहेत. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, "मी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो."

ट्रम्प मंचावर बोलत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आणि गोळी त्यांच्या कानाला लागली. ते जखमी झाले. या हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरही रक्त दिसत होते. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजता हा हल्‍ला झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT