Elephant Scratching itself 
आंतरराष्ट्रीय

Elephant Scratching video | ‘माझ्या पाठीत खाज उठत आहे जरा काठी दे’ : माहुताकडून काठी घेऊन अंग खाजवणाऱ्या हत्तीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल!

हत्तीच्या क्युट एस्प्रेशनने जिंकली अनेकांची मने

Namdev Gharal

Elephant Scratching itself सध्या सोशल मिडीयावर एका हत्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक हत्ती आपल्या माहुताकडील काठी ( गवत हलवण्याचे एकप्रकारचे दातरी हत्‍यार) त्‍याच्या हातातून काढून घेतो व त्‍याने आपले अंग खाजवत असल्याचे दिसत आहे. या कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. तर कमेंटही खूप येत आहेत.

व्हिडीओत दिसते की एका हत्तीने आपल्या काळजीवाहकाची काठी पटकन खाजवून घेण्यासाठी हळुवारपणे घेतली आणि सर्वांची मने जिंकली. आनंदाने स्वतःला खाजवून घेतल्यानंतर, त्या विशालकाय हत्तीने जणू काही घडलंच नाही अशा शांततेने ती काठी परत केली, ज्यामुळे त्याची बुद्धिमत्ता पाहून सर्वजण थक्क होत आहे.

या व्हिडीओवर आता खूप भारी कमेंट येत असून काहीजण या हत्तीला इंटरनेटवरील सर्वात सभ्य प्राणी म्हणत आहेत. त्याने ज्या काळजीपूर्वक ती काठी परत केली ते पाहून अनेकांना आर्श्चय वाटत आहे, तर काहींनी गंमतीने म्हटले की त्याचे शिष्टाचार बहुतेक माणसांपेक्षाही चांगले आहेत.

हत्ती हा बुद्धीमान व संवेदनशिल प्राणी

तज्ञांच्या मते हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात हुशार आणि संवेदनशील प्राण्यांपैकी एक मानले जातात. तो आपल्या सोंडेने बरीच कामे करत असतो चारा खाताना पाणी पिताना सोंड खूप उपयुक्त ठरते, काहीवेळा तो आपले शरीर सोडेंने खाजवत असतो हत्तीच्या शरीरावरील कातडी जाड असली तरी ती खूप संवेदनशील असते. काहीवेळा पाठीवर किंवा शरीराच्या ज्या भागांपर्यंत त्यांची सोंड किंवा पाय पोहोचत नाहीत, तिथे खाजवण्यासाठी हत्ती झाडाच्या सुक्या फांद्या, काठ्या किंवा बांबूचा वापर करतात. असे दिसून आले आहे.

त्‍यामुळेच आपल्या समोर आलेल्या माहूताच्या हातातील काठी बघून त्‍या हत्तीने पटकन ती घेतली व आपले कान, पोटाचा भाग खाजवला, व परत ती काठी त्‍या माहूताकडे दिली. हा व्हिडीओ कोणत्‍या ठिकाणचा आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण समाज माध्यमांवर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT