Dyson AI Toothbrush 
आंतरराष्ट्रीय

Dyson AI Toothbrush | जगभरात चर्चा या ५० हजारांच्या टूथब्रशची, दात घासण्यासाठी AI सह इन-बिल्ट कॅमेरा! (Video)

बिटीश टेक कंपनी डायसन Dyson लाँच केला हा अनोखा टूथब्रश

Namdev Gharal

Dyson AI Toothbrush : दात घासणे हे दररोज सकाळचे न चुकता करावे लागणारे काम, यासाठी टूथब्रशचा सर्रास वापर. या टूथब्रशमध्ये अनेक कंपन्या आहेत त्‍यांचे अनेक मॉडेल्स असतात. त्‍याचे ब्रिसल्स हे मऊ हार्ड असे येतात तसेच लहान मुलासांठी अनेक डिझाईन उपलब्ध असतात. पण डायसन या ब्रिटीश कंपनीने एक अनोखा व एआय चा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा एक टूथब्रश लाँच केला असून त्‍याची हवा जगभरात आहे. सर्व सोशल मिडीया प्लॅटफार्मवर याचीच चर्चा सुरु आहे. काय आहे हा टूथब्रश जाणून घेऊया.

काय आहेत याची वैशिष्ट्ये

लक्झरी व्हॅक्यूम क्लिनर आणि हेअर ड्रायरसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रँड 'डायसन'ने (Dyson) हा ब्रश लाँच केला आहे. कंपनीने ६ वर्षांच्या संशोधनानंतर Dyson CameraJet या नावाचा हा जगातील पहिला स्मार्ट AI टूथब्रश सादर केला आहे. या टूथब्रशमध्ये १ लाख पिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि प्रगत एआय (AI) सेन्सरही बसवण्यात आले आहेत.

दातांचा फटीत स्वच्छता करण्यासाठी तंत्रज्ञान

दात घासत असताना ब्रशच्या मानेवरील कॅमेरा तोंडाच्या आतील भागाचे लाईव्ह फुटेज युझरच्या स्मार्टफोनवर दाखवतो. दातांमधील बारीक खाचा ओळखण्यासाठी यात 'गॅप ऑप्टिकल टार्गेटिंग' तंत्रज्ञान दिले आहे. दात घासताना दोन दातांमधील जागा ओळखताच ब्रशमधून माउथवॉशची पिचकारी वेगाने फेकली जातो, ज्यामुळे आपोआप तेथिल अन्नाचे तुकडे साफ होतात. दातातली रिकामी जागा ओळखताच हा ब्रश अवघ्या १०० मिलीसेकंदांत माउथवॉशचा जेट फेकून फ्लॉसिंग करतो. कॅमेऱ्यासमोर फेसाचा अडथळा येऊ नये म्हणून कंपनीने यासाठी खास नॉन-फोमिंग (फेस न होणारी) टूथपेस्टही तयार केली आहे.

किंमत आहे ४९९ डॉलर्स

या टूथब्रशची आंतरराष्ट्रीय किंमत $499.99 (अंदाजे ₹४७,००० ते ₹४८,०००) ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर याच्या किमतीवरून आणि तंत्रज्ञानावरून मोठ्या प्रमाणावर मीम्स आणि चर्चा रंगू लागल्या आहेत. या ब्रशमध्ये १ लाख पिक्सलचा मायक्रो कॅमेरा बसवला आहे. हा कॅमेरा स्मार्टफोनशी जोडता येणार आहे त्‍यामुळे तुम्ही दात घासत असताना तोंडाच्या आत काय चाललंय, हे थेट तुमच्या मोबाईलवर लाईव्ह दिसू शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT