Dubai Princess Sheikha Mahra divorce
दुबईची राजकुमारी शेखा महरा बिंत मोहम्मद बिलाल रशीद अल मकतूम हिने तिच्या पतीला इंस्टाग्रामवर तिहेरी तलाक दिला आहे.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Dubai Princess Divorce : सवतींना कंटाळून दुबईच्या राजकुमारीचा पतीला इंस्टाग्रामवरून तलाक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dubai Princess Sheikha Mahra Divorce : दुबईची राजकुमारी शेखा महरा बिंत मोहम्मद बिलाल रशीद अल मकतूम हिने तिच्या पतीला इंस्टाग्रामवर तिहेरी तलाक दिला आहे. ‘मी तुला तलाक देते, तुला तलाक देते, तुला तलाक देते’ असे तिने तीन वेळा लिहिले आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. शेख महरा हिने दोन महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. गेल्या वर्षी 27 मे रोजी शेख महरा आणि उद्योजक शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचा निकाह पार पडला होता. वर्षभरातच काडीमोड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

1994 मध्ये जन्मलेल्या महराने दुबईतील एमबीआर स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून पदवी प्राप्त केली. शेख महारा यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इस्लामिक जगतात तिच्या लाईफस्टाईलची चर्चा होत राहते. ती यूएईचे संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी आहे. महरा ही शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या 26 अपत्यांपैकी एक आहे. तिची आई झो ग्रिगोराकोस ही ग्रीसची रहिवासी आहे. पण आई आणि वडीलही विभक्त झाले आहेत. तर महरा तिच्या आई सोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावरून शेअर करत असते.

राजकुमारीने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, ‘प्रिय पती, तू तुझ्या इतर पत्नींसोबत व्यस्त आहेस. म्हणूनच मी तुझ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. मी तुला तलाक देते, तुला तलाक देते, तुला तलाक देते.’ या पोस्टनंतर महारा हिने पतीसोबत सोशल मीडियावर अपलोड केलेले सर्व फोटो डिलीट केले आहेत.

शेख महराने दोन महिन्यांपूर्वीच मुलीला जन्म दिला होता. सोशल मीडियावर मुलीच्या जन्मानंतर लगेचच फोटो शेअर करून तिने हॉस्पिटलचा अनुभवही शेअर केला होता. राजकुमारी महरा यांनी दुबईच्या लतीफा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि 'बेबी माहरा'ला जन्म देणे हा 'सर्वात अविस्मरणीय अनुभव' असल्याची भावना व्यक्त केली होता. महाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या नवजात मुलीला छातीशी धरून बसलेली दिसत आहे. मात्र, तिला कन्यारत्न झाल्यावर तिने पत्नीशी घटस्फोट का घेतला असावा यावर आता चर्चा सुरू आहे.

SCROLL FOR NEXT